School Boy Effort To Control Fire Of Burning Tree  
पश्चिम महाराष्ट्र

तो चिमणी बनून आगीवर नियंत्रण मिळवत राहिला...

सकाळ वृत्तसेवा

सांगली : सांगली - मिरज रस्त्यावर एक झाडं जळत होतं... त्यानं एक दिवस मान टाकली आणि स्वतः मरताना आणखी तीन जीव घेतले. आष्टा येथे कॉलेजला मुलं घेऊन जाणाऱ्या वाहनावर ते झाडं कोसळलं. तीन मुलं मृत्यूमुखी पडली... अगदी काही महिन्यापूर्वीची गोष्ट... पण त्या दुर्दैवी घटनेतून आम्ही शहाणपणा घेतलाच नाही. आता मारुती चौकात आणखी एक झाडं रोज जळतंय... तेही एक दिवस मरेल, मरताना या चौकातील किती जणांच्या डोक्‍यावर पडेल? माणसं मेल्यावरच शहाणपण घ्यायचं का... 

"सकाळ'चे छायाचित्रकार उल्हास देवळेकर यांच्या नजरेतून हा क्षण सुटला नाही. कारण, देवळेकरांनी त्या तीन तरुणांचे गाडीत अडकलेले आणि झाडाखाली दबलेले मृतदेह पाहिले होते. रोज त्या झाडाच्या बुंध्यात कचरा जाळला जात होता. सोबत झाडही जळाले आणि कोसळले. कर्तव्य म्हणून छायाचित्र टिपताना देवळेकरांतील माणूस हादरून गेला होता. पुन्हा आपल्या शहरात तेच घडत असल्याच्या वेदनेने सुन्न होऊन त्यांनी पुन्हा एक छायाचित्र टिपले, आणखी एक झाडं हळूहळू जळत होते...पण त्या छायाचित्रात आणखी एक क्षण टिपला गेला...तो खूपच बोलका आहे. त्या झाडाखाली कुणीतरी कचरा पेटवला होता. रोजचा पेटवला जातो. तो धुमसतोय. सोबत झाडातील जीवं तपणा जाळून टाकतोय... ही आग एक दिवस जीवघेणी ठरेल, या भितीने एक शाळकरी मुलगा पाणी पिण्याच्या बाटलीतून त्यावर पाणी ओततोय... 

माझं नावं आग लावणाऱ्यामध्ये नाही...

एक लिटर पाण्याची ती बाटली. ती आगीवर नियत्रण मिळवू शकणारी नव्हतीच, मात्र त्याने तो प्रयत्न केला... त्यानं शाळेत "त्या चिमणीची गोष्ट' शिकलीय. एकदा जंगलात कुणीतरी आग लावली. खूप आग वाढली. झाडे जळू लागली. त्यावेळी सारे प्राण दूर पळाले. एक चिमणी मात्र शेजारील तळ्यातून आपल्या चोचीत पाणी घ्यायची आणि पेटत्या झाडांवर टाकायची. तिचे हे कृत्य पाहून एक प्राणी चिमणीला म्हणाला, ""तू केवढी, तुझी चोच केवढी. असं पाणी ओतून आग आटोक्यात येणार आहे का?'' तो प्राणी आजच्या सोशल मिडियावरील "ऍडिक्‍ट' मंडळींचे प्रतिनिधीत्व करत असावा. त्याला चिमणीने दिलेले उत्तर बिनतोड होते. ती म्हणाले, ""भविष्यात कधी या जंगलाला लागलेल्या आगीचा इतिहास लिहला जाईल तेंव्हा माझं नावं आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आगीवर नियंत्रण मिळवणाऱ्यांमध्ये येईल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: पॅट कमिन्सच्या जागेवर इशान किशन होणार SRH चा कर्णधार? काय आहेत नवे अपडेट्स?

'सनई चौघडे'चा पहिला भाग प्रेक्षकांना आवडला की नाही? नेटकऱ्यांना आठवली 'ही' जुनी मालिका, म्हणतात- जोडी भारीये पण...

Latest Marathi News Live Update : सिलिंडरचा तुटवडा, नागपुरमध्ये 15 ठिकाणी छापेमारी

'Dhurandhar' चित्रपट पाहून अडचणीत सापडला वैभव सूर्यवंशी... म्हणाला, माझी फेव्हरिट मुव्ही... सोशल मीडियावर गदारोळ

Gold Investment: HSBC चा पहिला Gold ETF लॉन्च! गुंतवणूकदार दूर जात असताना मोठी एंट्री; सोन्यात गुंतवणुकीची नवी संधी?  

SCROLL FOR NEXT