Scope for Chandoli tourism development; These suggestions were made by the Jayant Patil 
पश्चिम महाराष्ट्र

चांदोली पर्यटन विकासाला वाव; पालकमंत्र्यांनी केल्या या सूचना

सकाळवृत्तसेवा

वारणावती (जि. सांगली) : चांदोली धरण परिसर निसर्गाने नटलेला आहे. येथे पर्यटनाला वाव आहे. त्या दृष्टीने नियोजन करा. प्रस्ताव लवकर तयार करा, अशा सूचना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिल्या. 

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या मणदूरला भेट व चांदोली धरणाची पाहणी करण्यास मंत्री पाटील व आमदार मानसिंगराव नाईक आले होते. त्यावेळी त्यांनी सूचना केली. 

श्री. पाटील म्हणाले,""चांदोली परिसरावर निसर्गाची विशेष कृपा आहे. परिसर सदाहरित असतो. आशिया खंडातील क्रमांक दोनचे मातीचे धरण, मोठा जलसाठा, विद्युत निर्मिती प्रकल्प, नयनरम्य परिसर, चांदोली राष्ट्रीय उद्यान, गुढे-पाचगणी थंड हवेचे पठार, परिसरात पावसाळ्यात वाहणारे धबधबे सर्व काही निर्सगांनी नटलेले आहे. पर्यटकांना जे बघायला मिळत नाही, ते सर्व काही इथे आहे. पण हा परिसर दुर्लक्षित राहिला. पर्यटनाच्या दृष्टीने गांभीर्याने विचार केल्यास मोठ्या प्रकारे रोजगार निर्मिती होऊ शकते. उद्योगधंदे वाढू शकतात. युवक जो नोकरी, व्यवसायासाठी शहराकडे जातो तो येथेच थांबून त्याला काम मिळू शकेल. विविध व्यवसाय सुरू करता येतील. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी विचार करून संबंधित विभागांना आवश्‍यक सूचना द्याव्यात. एक आराखडा तयार करून लवकरात लवकर शासनाकडे सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

आमदार नाईक म्हणाले, ""पर्यटन विकास व्हावा, ही मागणी सातत्याने केली. तनाळी प्रकल्पातून वीज निर्मिती शक्‍य आहे. निसर्गाने नटलेल्या या परिसरातील लोकांना नोकरी, हमाली, छोटे मोठे उद्योग, व्यवसायासाठी मुंबई, पुण्याचा आधार घ्यावा लागतो. प्रसंगी पत्नी-मुले, आई-वडील यांना गावाकडे ठेवून शहरात जावे लागते. पर्यटन विकास झाल्यास छोटे मोठे व्यवसाय येथे सुरू होऊ शकतील. हाताला काम मिळेल. किंबहूना शिराळा तालुक्‍याचे नाव जगाच्या नकाशावर नावारूपाला येईल. एक वेगळी ओळख निर्माण होईल. मंत्रीमहोदयांनी पर्यटन विकासात लक्ष घालावे. शासनाकडे मी बाजू मांडत आहे. त्यांनी लक्ष घातल्यास अधिक बळकटी येऊन विषय लवकर मार्गी लागेल.'' 

पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता आर. डी. मोहिते, अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, युवा नेते विराज नाईक, सहाय्यक अभियंता मिलिंद किटवाडकर, शाखाधिकारी प्रमोद धामणकर उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT