सांगली : शहरातील विजयनगर परिसरातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने प्रशासनाने शहरात एक किलोमीटरचा कंटेन्मेंट झोन आणि त्यापुढील चार किलोमीटरचा बफर झोन अधिसूचित केला आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील मोठ्या प्रमाणात रहिवाशी क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोनमधील रहिवाशांनी घराबाहेरच पडू नये असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये विविध प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.
तसेच कलम 144 अन्वये बंदी आदेशही लागू केले आहेत. महापालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर परस्पर संपर्कामुळे या विषाणूचा संसर्ग व प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेता जीविताला, आरोग्याला अथवा सुरक्षिततेला धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे महापालिका हद्दीतील ज्या भागात कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळून आले आहेत,
त्या भागामध्ये विषाणूचा संसर्ग व प्रसार होवू नये यासाठी सदर भागातील व्यक्ती, जनतेच्या हालचालींवर व प्रतिबंधीत क्षेत्रातून येणे-जाणे करण्यास प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी महापालिका हद्दीत कंटेनमेंट झोन व बफर झोन अधिसूचित केले आहेत. या भागांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पारित करण्यात आलेल्या सर्व प्रतिबंधात्मक आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केली आहे.
कंटेनमेंट झोनमधील क्षेत्र : (1) विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश) ते विश्रामबाग रेल्वे फाटक, (2) विश्रामबाग रेल्वे फाटक ते विद्यानगर वारणाली ते जिल्हा परिषद कॉलनी, (3) जिल्हा परिषद कॉलनी ते कुमार हासुरे नगर ते अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक), (4) अहिल्यादेवी होळकर चौक (चाणक्य चौक) ते पालवी हॉटेल (बायपास रोड), (5) पालवी हॉटेल (बायपास रोड) ते भारती हॉस्पीटल सांगली मिरज रोड, (6) भारती हॉस्पीटल ते वानलेसवाडी ते हसनी आश्रम चौक, (7) हसनी आश्रम चौक ते स्फुर्ती चौक ते विश्रामबाग चौक (हॉटेल हरीश). या स्थलसीमा मध्ये अंतर्भूत क्षेत्र (न्यायालय इमारत, प्रशासकीय इमारत व जिल्हाधिकारी कार्यालय हे ना-रहिवाशी क्षेत्र वगळून).
बफर झोन : कंटेनमेंट झोनच्या स्थलसीमा हद्दीबाहेरील चार कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्रात समाविष्ट महापालिका हद्दीतील क्षेत्र.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.