पश्चिम महाराष्ट्र

एक सुंदर फूटपाथ विकणे आहे! तासगाव पालिकेचा अजब कारभार

सकाळ वृत्तसेवा

तासगाव (सांगली) : नागरिकांचा होणारा विरोध डावलून नगपालिकेने एक सुंदर फूटपाथ विकण्याचा घाट घातला असून, आता त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी हा फूटपाथ भुई भाड्यावर देण्यात येणार आहे. (Selling-sidewalks-Tasgaon-Municipality-by-suppressing-the-protests-of-the-citizens-akb84)

शहराच्या बाहेर असलेल्या मुख्य प्रशासकीय इमारतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे दोन-वर्षांपूर्वी सुशोभीकरण करण्यात आले. एका बाजूला फूटपाथ, दोन्ही बाजूला झाडे आणि रुंद रस्ता यामुळे हा रस्ता सध्या शहरातील एकमेव अतिक्रमण, खोके विरहित असा हा दोनशे मीटरचा रस्ता आहे. याच परिसरात क्रीडा संकुल आणि एक मोठी शाळा आहे. या रस्त्यावरील फूटपाथसाठी १५-२० लाख रुपये खर्चही करण्यात आले आहेत. मात्र शहरातील एकमेव चांगल्या रस्त्याची ‘वाट’ लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्यावरील फूटपाथ भुई भाड्यावर विकण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रस्त्याच्या कडेला असणारे फूटपाथ हे चालण्यासाठी असतात, मात्र या फूटपाथवर २० ते २५ प्लॉट पाडण्यात आले असून, त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्रत्येक प्लॉट साठी कमीत कमी पंचवीस हजार रुपये पालिकेला अपेक्षित असून प्रत्येक प्लॉटसाठी बोली लावण्यात येणार आहे. जो जास्त किंमत देईल त्याला तो प्लॉट देण्यात येणार असून, पालिकेच्या डिझाइनप्रमाणे गाळा बांधकाम करावयाचे आहे. फुटपाथच्या या रस्त्यावर समोर प्रशासकीय इमारत असल्याने या एकेका प्लॉटला लाखो रुपये डिपॉझिट म्हणून मिळून पालिकेच्या तिजोरीत भर पडेल, असा पालिकेतील कारभाऱ्यांचा कयास आहे.

‘‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल’’ युवकांना रोजगार मिळण्यासाठी हे करण्यात येत असल्याची मखलाशी करण्यात आली आहे. दरम्यान, पालिकेच्या या निर्णयाला नागरिकांमधून विरोध सुरू झाला आहे. वृन्दावन कॉलनी मधील नागरिक या विरोधात एकत्र येऊ लागले आहेत. गेल्या पाच वर्षांत एकही धोरणात्मक निर्णय न घेतलेल्या पालिकेने किमान शहराचे विद्रुपीकरण तरी करू नये, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Bus Accident : येरमाळा घाटात बसचा अपघात! प्रवाशांनी प्रत्यक्ष मृत्यूचा साक्षात्कार अनुभवल्याची थरारक घटना, क्षणार्धात बस सुमारे २० ते २५ फूट खोल खड्ड्यात कोसळली

8 Feet Crocodile Spotted in Krishna River : औदुंबरच्या कृष्णा नदीच्या डोहात आढळली आठफुटी मगर; घाटावर दररोज उन्हात बसताना दिसल्याने भाविकांमध्ये खळबळ

Sudden Underarm Pain: काखेत अचानक दुखायला लागलंय? साधी वेदना समजून दुर्लक्ष करू नका; 'या' कारणांमुळे होऊ शकतो त्रास

Latest Marathi News Live Update : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Sugarcane Crisis : महाराष्ट्राचे ठरले, कर्नाटकातील गळीत हंगाम कधी? साखर कारखान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता; उताऱ्यात घट अन्‌ दराचाही परिणाम

SCROLL FOR NEXT