Senior writer Vasant Keshav Patil Passed Away esakal
पश्चिम महाराष्ट्र

Vasant Patil : ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत केशव पाटील यांचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

कुमठे येथील प्रा. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयांत अध्यापन केले.

सकाळ डिजिटल टीम

सत्यकथा, किर्लोस्करसह मराठीतील सर्व नामवंत दैनिके, नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन केले.

सांगली : साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त (Sahitya Akademi Award) लेखक, ज्येष्ठ साहित्यिक वसंत केशव (Writer Vasant Patil) तथा व. के. पाटील (वय ७९) यांचे काल (बुधवार) सकाळी आठ वाजता निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांचे घरीच निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शुक्रवारी (ता. २६) सकाळी नऊ वाजता आहे.

मूळचे तासगाव तालुक्यातील (Tasgaon) कुमठे येथील प्रा. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळा-महाविद्यालयांत अध्यापन केले. यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह दिग्गज नेते, विचारवंतांचे विचार तसेच त्‍यांच्‍या सहवासात ते घडले. त्यांच्या पुरोगामी विचारांची कास धरून त्यांनी आपली वाटचाल केली.

स्पष्ट वक्ते, साक्षेपी समीक्षक म्हणून अनेक संमेलनात त्यांनी अध्यक्षपदांसह अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. सांगलीसह जिल्‍ह्यातील सांस्कृतिक घडामोडींमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग होता. अनेक नवोदितांच्या पाठीवर अधिकारवाणीने हात ठेवणाऱ्यांपैकी ते होते. मराठी साहित्याच्या प्रांतात अलीकडच्या चार दशकांत सांगलीची पताका फडकवणाऱ्या महत्त्वाच्या लेखकांमध्ये वसंत केशव पाटील यांचे स्थान अग्रस्थानी राहिले. ती ओळख त्यांनी आपल्या निरंतर कसदार लेखनाने निर्माण केली.

कथा, कविता, ललितलेखन, गझल, अनुवाद, समीक्षा अशी त्यांनी साहित्याच्या प्रांतात मुशाफिरी केली. १९९० मध्ये त्यांचा ‘छप्पर’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. हिंदीतील प्रख्‍यात लेखक डॉ. हरिवंशराय बच्चन यांच्या ‘दशद्वार ते सोपान’ या आत्मचरित्राच्या अनुवादासाठी १९९६ मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. त्याची प्रसिद्धी ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ पुरवणीत क्रमशः झाली होती. त्यानंतर मराठी साहित्यविश्‍वात त्यांची अनुवादक अशी ओळख निर्माण झाली.

‘यशवंतराव : विचार आणि वारसा’ हा त्यांचा ग्रंथ प्रतिमा प्रकाशनच्या वतीने प्रसिद्ध झाला. १९९० मध्ये छप्पर कथासंग्रह, १९९३ मध्ये ‘आधुनिक शिक्षा शिल्पी : कर्मवीर भाऊराव पाटील’ असे ग्रंथ प्रसिद्ध झाले. कंदिलाचा उजेड, सहीमागाचा माणूस, दीपराग, कथांतर, अखेरचे झोपडे, एका पुस्तकाचा पाठलाग, माती माय, पंख फुटीचे दिवस, आणि समजा, त्याने जंगल जिंकले, परशा, यशाची यशोगाथा, पूजा का दिया, अशा सुमारे २० हून अधिक पुस्तकांचे त्यांनी लेखन केले.

सत्यकथा, किर्लोस्करसह मराठीतील सर्व नामवंत दैनिके, नियतकालिकांत त्यांनी विपुल लेखन केले. अलीकडेच त्यांच्या ‘फाळणीच्या कथा’ या हिंदीतील नरेंद्र मोहन यांच्या द्विखंडात्मक ग्रंथाचा त्यांनी मराठीत अनुवाद केला होता. ‘केशवसुतांच्या निवडक कवितांचे संपादन व समीक्षा’ ग्रंथाचे लेखनही त्यांनी पूर्ण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT