Vittal havannavar
Vittal havannavar sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : पोलिस अधिकाऱ्याचे वेगळे नाईट पेट्रोलिंग बनले चर्चेचा विषय

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी शहरातील एक पोलीस उपनिरीक्षक आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी सायकलीवरून गस्त घालत आहे. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्याच्या वेगळ्या नाईट पेट्रोलिंचे कौतुक सुरू असून शहरात पोलीस वर्तुळात हा चर्चेचा विषय बनला आहे.

मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हवण्णावर हे गेल्या काही दिवसापासून रात्रीच्या वेळी एकटेच सायकलीवरून गस्त घालत आहेत. आज पर्यंत आपण पोलीस मोटार किंवा मोटरसायकलवरून फिरताना पाहिले आहे. मात्र, यापलीकडे जाऊन श्री. हवण्णावर यांनी सायकलीवरून पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली आहे. सायकलिंग मुळे शरीराचा व्यायाम होण्याबरोबरच आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकांना सहज भेटता यावे, यामागील त्यांचा हेतू आहे. पोलिस म्हटले की सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. पण, पोलिस आणि समाजातील दुरी कमी व्हावी, यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

पोलीस खाते पीपल फ्रेंडली बनविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहेत. मध्यंतरी सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये पायी गस्त घालण्यास सुरुवात केली होती. मात्र ही गस्त अवघे काही दिवसच चालली. त्यानंतर आता त्यामध्ये खंड पडला आहे. मार्केट पोलीस स्टेशन अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक श्री हवण्णावर यांनी सायकलवरून नाईट पेट्रोलिंग सुरू केले असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांच्या नाईट सायकल पेट्रोलिंगचा इतर पोलिस अधिकाऱ्यांची देखील आदर्श घेण्यासारखा आहे.

गेल्या काही दिवसांपासून आपण सायकलीवरून नाईट पेट्रोलिंग सुरू केले आहे. सायकलीवरून फेरफटका मारल्यास व्यायाम तर होतोच तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेटता येते.

- विठ्ठल हावण्णावर, पोलीस उपनिरीक्षक मार्केट ठाणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT