Sewage in Miraj increased the stench and mosquito infestation everywhere 
पश्चिम महाराष्ट्र

मिरजेत सांडपाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी, डासांचा उपद्रव वाढला

प्रमोद जेरे

मिरज : काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शहरातील गल्ली बोळ आणि उपनगरांत सांडपाण्याची तळी साचली आहेत. शेकडो अपार्टमेंट, खासगी बंगल्याच्या तळघरात साठलेल्या पाण्यामुळे ही तळघरे नरक झालीत. सर्वत्र दुर्गंधी, डासांचा उपद्रव वाढला आहे. नागरिक हैराण आहेत. 

सांडपाण्यामुळे साथीच्या रोगांची शक्‍यता वाढली असूनही प्रशासन निद्रिस्त आहे. काही वर्षात शहरात जागोजागी सांडपाणी तुंबण्याची समस्या नेहमीची बनली आहे. रुग्णालये, हॉटेल, अन्य ठिकाणी कचराही सांडपाण्यात सोडण्याचे प्रकार सुरू आहेत. शहरात सांडपाण्याची जुन्या शाश्वत यंत्रणेची कारभारी, प्रशासनाने पुरती वाट लावल्याने शहरात जागोजागी सांडपाणी तुंबले आहे. 

अपार्टमेंट आणि खासगी बंगल्यातील तळघरांनी या समस्येत आणखी भर घातली आहे. सध्या शहराच्या कानाकोपऱ्यात डासांचा प्रंचड उपद्रव नागरिकांना होत आहे. साहजिकच घरोघरी साथ रोगांना बळी पडलेले रुग्ण सापडत आहेत. कोरोनाने त्रस्त नागरिकांना सांडपाण्याची दुर्गंधी, साथरोगांचे संकट म्हणजे "दुष्काळात धोंडा' सारखे वाटत आहे. 

मिरज शहराची नैसर्गिक रचना बशीसारखी आहे. सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी अभ्यासपुर्वक एक खास योजना सन 1971 मध्ये जागतिक बॅंकेच्या निधीतून पुर्ण करण्यात आली. पण पस्तीस वर्षात शहरातील कारभारी, अभियंत्यांनी जुन्या योजनेची पूर्ण वाट लावली आहे. बेकायदेशीरपणे तळघरांना परवानग्या दिल्याने समस्या गंभीर बनली. गंभीर बनत चाललेल्या समस्येबाबत प्रशासन तर दूरच पण साधन सुचितेचा आव आणणारे कारभारीही गंभीर नसल्याचे चित्र आहे. 

मिरजेत गल्लीबोळात कोरोनाने बरे झालेले रुग्ण आहेत. त्यापैकी मधुमेह, रक्तदाब किंवा अन्य विकार असलेल्यांना पुन्हा साथीच्या रोगांची लागण झाली तर स्थिती गंभीर बनू शकते. महापालिका प्रशासनाने तातडीने सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. 

-डॉ. शिवानंद कुलकर्णी, जनरल प्रॅंक्‍टिशनर 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT