Anna Bhau Sathe Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Lokkala Sammelan : राज्यातले पहिले शाहिरी, लोककला संमेलन वाटेगावात; शाहिरांच्या विचारांचा होणार जागर

वाटेगांव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकमध्ये शाहिरांच्या विचारांचा जागर संपन्न होत आहे.

विजय लोहार

नेर्ले - उद्या (रविवारी दि. २०) वाटेगांव (ता. वाळवा) येथील क्रांतिवीर बर्डे गुरुजी स्मारकमध्ये शाहिरांच्या विचारांचा जागर संपन्न होत आहे. संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. जेष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे (करवडी) या सकाळी १० वाजता संमेलनाचे उदघाटन करणार आहेत.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सुनबाई सावित्री साठे, नातू सचिन साठे, प्रा. डॉ. बाबुराव गुरव, महेंद्र रोकडे यांची प्रमुख उपस्थिती आहे. राज्यातील दिग्गज शाहीर, लोक कलावंत यामध्ये सहभागी होत असून लोककला, लोकसंस्कृती व लोकसाहित्य या विषयावर परिसंवादही होत आहे. दिवसभर चालणाऱ्या या संमेलनाचा लाभ आपण घ्यावा, असे आवाहन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, माजी सभापती रविंद्र बर्डे यांनी केले आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, लोक शाहीर वामनदादा कर्डक आणि लोकशाहीर अमर शेख यांचा वारसा पुढे नेण्यासाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मभूमीत हे पहिले संमेलन होत आहे. भविष्यात राज्यातील लोकशाहीर व लोक कलावंतांचे अण्णाभाऊंचे जन्मगांव हे केंद्र व्हावे, असा संयोजकांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने स्थानिक व राज्यातील असंख्य कार्यकर्ते गेल्या महिना-दीड महिन्यापासून परिश्रम घेत आहेत.

सकाळी १० वाजता उदघाटन सत्र होणार आहे. मंगला बनसोडे या संमेलनाचे उदघाटन करतील. माजी सभापती रविंद्र बर्डे हे स्वागताध्यक्ष असून डॉ. भारत पाटणकर हे संमेलन घेण्यामागची भूमिका मांडणार आहेत. याप्रसंगी शाहीर शीतल साठे यांचे छक्कड गायन होणार आहे.

यानंतर पहिल्या सत्रात लोककला, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य या विषया वर परिसंवाद होणार आहे. कॉ. धनाजी गुरव यांच्या अध्यक्षतेखालील या परिसंवादात कॉ. जयंत निकम प्रास्ताविक करणार आहेत. प्रा. सचिन गरुड (इस्लामपूर), प्रा. डॉ. शरद गायकवाड (कोल्हापूर), पत्रकार विजय मांडके (पुणे), शाहीर सचिन माळी (तासगाव) हे प्रमुख वक्ते आहेत. दुसऱ्या सत्रात शाहिरी आणि लोककलेचे सादरीकरण होणार आहे.

शाहीर सदाशिव निकम, शाहीर शीतल साठे, शाहीर सचिन माळी, शाहीर रमेश बल्लाळ, शाहीर देवानंद माळी, शाहीर रणजित कांबळे, शाहीर अमर पुणेकर, शाहीर मेघानंद जाधव, शाहीर निशांत शेख, शाहीर महादेव खंडागळे, शाहीर कृष्णा कांबळे, शाहीर बापू पवार, शाहीर आलम बागणीकर, शाहीर मिलिंद वाघमारे, यश कांबळे, कुशल शिंदे, कुमार शहारे यांच्यासह राज्यातील दिग्गज शाहीर सादरीकरण करणार आहेत.

प्रा. गौतम काटकर सूत्र संचालन करणार असून, अनिकेत मोहिते (पुणे), योगेश साठे (वाटेगाव) हे समारोप करणार आहेत. हे संमेलन दिवसभर चालणार असून या संमेलनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. पाटणकर, आणि श्री. बर्डे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT