In the Shahu Market Yard, the jaggery has got a higher price kolhapur marathi news  
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरी गुळाला मिळाला 'इतका' उच्चांकी भाव...

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर - महापुरामुळे जिल्ह्यातील बहुतांश उसाचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा गूळ उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे गुळाची आवक मर्यादित आहे. परिणामी शाहू मार्केट यार्डातील गूळ बाजारात यंदाच्या हंगामातील ५ हजार ८०० असा उच्चांकी भाव लहान गुळाला मिळाला आहे. त्यामुळे गूळ उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा; लहान गूळ रव्यांची आवक वाढती

जिल्हाभरात यंदा पावसाचा जोर वाढता राहिल्याने महापूर आला. सोबत अवतीभोवतीची शेतीही पाण्याने वेढली गेली. नदीकाठच्या शेतीत महिन्यापेक्षा अधिक काळ पाणी साचून राहिले. त्यामुळे उसाची वाढ खुंटली. त्यातून गूळ बनविण्यासाठी पुरेशा प्रमाणात ऊस मिळत नाही. अशा स्थितीत ज्यांच्याकडे ऊस चांगल्या स्थितीत आहे अशा शेतकऱ्यांकडून गूळ उत्पादन घेतले जात आहे.जिल्हाभरात जवळपास १५० वर गुऱ्हाळघरांत सध्या उत्पादन घेतले जात आहे. यापैकीच एक असलेले तिरपण (ता. पन्हाळा) येथील सचिन पाटील यांनी गुळाचे उत्पादन घेतले. एक किलोच्या गूळ रव्यांना मागणी असल्याने १५१ रवे त्यांनी बाजारात आणले. त्याला ५ हजार ८०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला.

अडचणींचा डोंगर

दोन वर्षांत गुळाला भाव बऱ्यापैकी (सरासरी तीन हजार) मिळत आहे; मात्र गुऱ्हाळघराला मनुष्यबळ सहज मिळणे मुश्‍कील झाले आहे. अशात मर्यादित वीजपुरवठा व तसेच कारखान्यांना ऊस घालण्याचा वाढता कल यामुळे गुऱ्हाळघरे संकटात आली आहेत. त्यामुळे गुळाची आवक जेमतेम होत आहे. यंदा बाजारपेठेत गतवर्षीच्या तुलनेतही प्रतिक्विंटलला शंभर ते दोनशे रुपये भाव जास्त मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

संगमनेरकरांना मोठा दिलासा! आमदार खताळ यांच्यामुळे भूखंड आरक्षणावर निघाला तोडगा

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

SCROLL FOR NEXT