Shindes team in the field to pierce Vikhe's dominance marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

विखे यांच्या वर्चस्वाला छेद देण्यासाठी शिंदेंची "टीम' मैदानात

विठ्ठल लांडगे

नगर : भारतीय जनता पक्षाच्या उत्तर व दक्षिण नगर जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी शुक्रवारी (ता. 10) होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर पदासाठी इच्छूक असलेल्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनीच आपापल्या मर्जीतील इच्छूकांसाठी जोरदार "फिल्डिंग' लावली आहे. त्यातही मुख्यत्वे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पक्षातील वर्चस्व रोखण्यासाठी व त्यांना शह देण्यासाठी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार शिवाजी कर्डिले, तर उत्तर जिल्हाध्यक्षपदासाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना संधी देण्यासाठी माजी मंत्री राम शिंदे यांच्या "टीम'ने कंबर कसली आहे. 

अलिकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते विखे पाटील यांच्या "विखे पॅटर्न'मुळेच माजी मंत्री राम शिंदे, कर्डिले, मुरकुटे, कोल्हे यांना पराभवाचा सामना करावा लागला, अशी तक्रार दस्तुरखुद्द माजी मंत्री शिंदे व कर्डिले यांनीच पक्षश्रेष्ठींकडे केली होती. त्यातून विखे व शिंदे या नेत्यांमधील वाद उफाळून आला होता. जिल्ह्यातील भाजपमध्ये अगोदरच दोन गट मानले जात होते. त्यात विखे पाटील यांच्या तिसऱ्या गटाने प्रवेश केल्याने जिल्ह्यातील नव्या पदाधिकारी निवडीत नवीन संघर्ष उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. 

ताकीद देऊनही वाद कायम

राज्यात नव्या समिकरणांनुसार महाविकास आघाडी सत्तेत आली. त्यामुळे भाजपच्या सर्वच नेत्यांना एकत्र काम करावे लागेल, अशा कानपिचक्‍या मुंबईत मागील महिन्यात झालेल्या बैठकीत खुद्द माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या होत्या. विखे व शिंदे यांना वाद मिटविण्याची ताकीद देऊन त्यांच्याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत भाजपला संधी मिळविण्याची जबाबदारी दिली होती. तथापि, त्या निवडीतदेखील या नेत्यांमधील वाद संपुष्टात आलाच नाही. त्यामुळे आताही पदाधिकारी निवडीत हा वाद कायम राहील, असेच संकेत आहेत. 

दुसऱ्या फळीतील नेत्यांचा विचार होईल का?

किमान उत्तरेतील जिल्हाध्यक्ष आपल्या मर्जीतील असावा, अशी मोर्चेबांधणी विखे पाटील यांच्याकडून होईल. मात्र, त्यांच्या गटाला तीदेखील संधी दिली जाऊ नये, अशी अटकळ सर्वांनीच घातली आहे. या निवडीचा वाद थेट श्रेष्ठींच्या दरबारात जाण्याची शक्‍यता आहे. त्यातही निवडणूक पद्धतीने निवडी झाल्यास विखे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांचेच पारडे जड पडेल, असे सांगितले जात आहे. त्यातही जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदारांचीच नावे चर्चेत आल्यास विखे यांच्याकडील दुसऱ्या फळीतील नेत्यांचा विचार होईल का, असा प्रश्‍न आहे. एकंदरीत या निवडीही नव्या वादाची सुरुवात असेल, असेही बोलले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT