Shirala Nagar Panchayat is managing its work in the old building of the Gram Panchayat 
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा नगपंचायत  वार्तापत्र ; इमारतीला जागा देता का? 

शिवाजीराव चौगुले

शिराळा : शिराळा नगरपंचायतीचा कारभार जुन्या इमारतीत व अपुऱ्या जागेत सुरू आहे. नगरपंचायतीला सुसज्ज इमारतीची प्रतीक्षा आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी पर्यायी जागांचा शोध सुरू आहे. 

शिराळा हे तालुक्‍याचे ठिकाण. येथे 19 डिसेंबर 1940 रोजी शिराळा ग्रामपंचायतीची स्थापना झाली. 53 वर्षे जुन्या इमारतीत कारभार सुरू होता. सन 1993 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार जीवन सुधार योजनेतून ग्रामपंचायतीसाठी नवीन इमारत बांधण्यात आली. अजूनही त्याच इमारतीत ग्रामपंचायत ते नगरपंचायत असा कारभार सुरू आहे. 

शिराळ्यात 75 वर्षे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. 16 मार्च 2016 रोजी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत झाले. 75 वर्षाच्या कार्यकाळात 19 सरपंचांना कामाची संधी मिळाली. यशवंत शिंदे हे पहिले, तर गजानन सोनटक्के शेवटचे सरपंच ठरले. 

16 मार्च 2016 रोजी नगरपंचायतची स्थापना झाली. त्यावेळी नागपंचमीच्या मुद्यावर सर्वपक्षीय बहिष्कार टाकण्यात आला होता. पुन्हा सहा महिन्यांनी निवडणूक लागली. विद्यामान आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख यांच्या गटाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यात 17 पैकी 11 जागांवर राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांच्या गटाने व 6 ठिकाणी माजी आमदार शिवाजीराव नाईक गटाने विजय मिळवला. पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा मान मावळते सरपंच गजानन सोनटक्के यांच्या पत्नी सुनंदा सोनटक्के यांना मिळाला. त्यांच्यानंतर अर्चना शेटे आणि विद्यामान नगराध्यक्षा सुनीता निकम यांना संधी मिळाली आहे. 

नगरपंचायतीच्या काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने त्या प्रशासकीय व राजकीय पातळीवर कशा प्रकारे दूर करता येईल याचा विचार सुरू आहे. इमारतीचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे. 

पुरेशी जागाच मिळेना 
नगरपंचायतीचा कारभार जुन्या इमारतीत अपुऱ्या जागेत सुरू आहे. निधी असून ही इमारत बांधण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. अनेक ठिकाणी जुन्या कार्यालयांच्या रिकाम्या व वापरता नसलेल्या इमारतींचा पर्याय पुढे येत आहे. 

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : इगतपुरी तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT