Shirdi airport equipped with "DVOR" system
Shirdi airport equipped with "DVOR" system 
पश्चिम महाराष्ट्र

शिर्डी विमानतळावर "डीव्हीओआर' यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा

शिर्डी ः विमानतळ सुरू झाल्यानंतर तब्बल दोन वर्षांनंतर महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने येथे "डॉपलर व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी ओमनी रेंज' (डीव्हीओआर) यंत्रणा बसविली. ही यंत्रणा कार्यान्वित झाली की या विमानतळावर रात्री व कमी दृश्‍यमानता असतानाही विमानसेवा सुरू ठेवता येणार आहे. डायरेक्‍टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए)च्या तज्ज्ञांचे पथक या यंत्रणेची चाचणी घेणार असून, नव्या वर्षात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यास परवानगी मिळून "नाइट लॅंडिंग' सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. 


या "नाइट लॅंडिग' सुविधेअभावी इच्छा असूनही परदेशी विमान कंपन्यांना आपली सेवा येथे सुरू करता येत नव्हती. हे विमानतळ नावापुरतेच आंतरराष्ट्रीय आहे. फळे व भाजीपाल्याच्या व्यापाऱ्यांसाठी येथून कार्गो सेवा सुरू केल्यास आम्ही त्यात सहभागी होण्यास इच्छुक आहोत, असा प्रस्ताव "स्पाइस जेट' विमान कंपनीकडे येथील काही व्यापाऱ्यांनी दिला आहे. पुढील महिन्यापासून नाइट लॅंडिंग सुरू झाले, तर शिर्डी विमानतळ जगाच्या नकाशावर येण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडेल. कार्गो सेवा सुरू झाली, तर फळे व भाजीपाल्याच्या लागवडीस भविष्यात काही प्रमाणात चालना मिळू शकेल. 

"स्पाइस जेट'ची विमानसेवा सुरू 
कमी दृश्‍यमानतेवर मात करून विमानसेवा सुरू ठेवू शकणारी यंत्रणा नसल्याने गेल्या बावीस दिवसांपासून बंद असलेले शिर्डी विमानतळ आज पुन्हा सुरू झाले. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्याने स्पाइस जेट कंपनीने आपली विमानसेवा आजपासून अंशतः सुरू केली. चेन्नई येथून साईभक्तांना घेऊन आलेले बोइंग विमान दुपारी दोनच्या सुमारास धावपट्टीवर उतरले. 

ओस पडलेल्या विमानतळावर पुन्हा चैतन्य आले. प्रवाशांची ने-आण करण्यासाठी विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या खासगी वाहनचालकांचा व्यवसाय आजपासून काही प्रमाणात सुरू झाला. कालपर्यंत रिकाम्या असलेल्या विमानतळ रस्त्यावरून आज भाविकांना घेऊन वाहने धावू लागली. लवकरच हे विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू होईल. त्याचा फायदा आपल्या व्यवसायाला होईल, अशी आशा या वाहनचालक व मालकांना वाटू लागली आहे. 

स्पाइस जेट कंपनीने आपल्या यापूर्वीच्या नऊपैकी सहा विमानांची ये-जा येथून सुरू केली. इंडिगो कंपनी येत्या 15 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू करणार आहे. या दोन्ही कंपन्या बावीस दिवसांपासून औरंगाबाद विमानतळावरून शिर्डीसाठी सेवा देत होत्या. तथापि औरंगाबाद ते शिर्डी हे सव्वाशे किलोमीटरचे अंतर मोटारीने येण्या-जाण्याचा खर्च, तसेच खराब रस्त्यांमुळे होणारा त्रास यामुळे प्रवाशांकडून या सेवेला थंड प्रतिसाद मिळत होता. आजपासून थेट शिर्डीसाठी पुन्हा विमानसेवा सुरू झाल्याने अपवाद वगळता आजच्या जवळपास सर्व उड्डाणांमध्ये प्रवाशांच्या संख्येत समाधानकारक वाढ झाल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

आजचा दिवस आनंदाचा 

विमानतळ बंद पडल्याने गेल्या बावीस दिवसांपासून बंद असलेली आमची रोजीरोटी काही प्रमाणात सुरू झाली. पुढील चार-पास दिवसांत विमानांची संख्या वाढेल. पूर्वीप्रमाणे व्यवसाय सुरू राहील, अशी आशा निर्माण झाली आहे. आजचा दिवस आमच्या दृष्टीने आनंदाचा आहे. 
- प्रभाकर गुंजाळ, अध्यक्ष, वाहन चालक-मालक संघटना, काकडी विमानतळ  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

T20 Cricket: 12 धावात खेळ खल्लास! तब्बल 6 फलंदाज भोपळाही फोडला नाही; टी20 सामन्यात झाला अनोखा विक्रम

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

SCROLL FOR NEXT