Gulabrao Patil vs MP Sanjay Raut esakal
पश्चिम महाराष्ट्र

Gulabrao Patil : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांना गुंड वाटतात; असं का म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील?

खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड नीलेश घायवळ याचा फोटो ट्विट केला आहे.

हेमंत पवार

''छगन भुजबळ वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी भावना व्यक्त केली आहे. भावना म्हणजे कृती नाही. हे कृतीत आल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल.’’

कऱ्हाड : कोणाबरोबर कोणत्या वृत्तीचा माणूस असतो, कोणत्या नेत्याबरोबर कोण आहे, हे कोणी तपासत नाही. आत्ता माझ्यासोबत कोण आहे, हे मला माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ठाकरे गटासोबत होते. तेव्हा ते साधुसंत होते आणि आता त्यांना गुंड वाटतात, असा टोला खासदार संजय राऊत यांना पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी लगावला.

मंत्री पाटील येथील विमानतळावरून विटाकडे (जि. सांगली) रवाना होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड नीलेश घायवळ याचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोवरून महाराष्ट्र देशातील सर्वांत मोठा गुंडगिरीचा अड्डा असल्याचे म्हटले आहे.

त्यावर पाणीपुरवठामंत्री पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर खासदार राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे गटासोबत होते, तेव्हा ते साधुसंत होते आणि आता त्यांना गुंड वाटतात. गेल्या दीड -दोन वर्षांपासून ठाकरे गटाकडून आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून शिंदे गटातील गद्दारांना गाडण्याची भाषा बोलली जात असल्याचे आम्ही ऐकत आहोत. मात्र, जनताच ठरवेल आता काय ते.’’

भुजबळ चुकीचा निर्णय घेणार नाहीत

ओबीसी समाजाकडून वेगळा पक्ष काढण्याची घोषणा प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. या अगोदर त्यांनी छगन भुजबळ यांच्याशी सल्लामसलत केली आहे. त्याबाबत मंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘छगन भुजबळ मंडल आयोगापासून ओबीसींचे काम करतात. त्यांचा मार्ग हा ओबीसींचा आहे. त्यांना जे वाटते ते बोलतात. छगन भुजबळ वेगळा पक्ष काढण्याचा चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी भावना व्यक्त केली आहे. भावना म्हणजे कृती नाही. हे कृतीत आल्यानंतर त्यावर बोलणे उचित होईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ७०–८० वयातही शिकण्याची धडपड! महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे ‘आजीबाईंची शाळा’; व्हायरल व्हिडिओ पाहून व्हाल भावूक

नव्या नवरीवर भारी पडला जाऊबाईंचा तोरा! अनुष्कापेक्षा सुंदर दिसते तिची जाऊ; मेघनच्या वहिनीला पाहिलंत का?

Horoscope Prediction : उद्या तयार होतोय गजकेसरी राजयोग; मिथुन राशीबरोबर पाच राशींना लागणार जॅकपॉट !

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

SCROLL FOR NEXT