Shivajirao Patil, leader of Primary Teachers' Association, passed away
Shivajirao Patil, leader of Primary Teachers' Association, passed away 
पश्चिम महाराष्ट्र

माजी आमदार शिवाजीराव पाटील काळाच्या पडद्याआड

सकाळ वृत्तसेवा

इटकरे (जि. सांगली) :  प्राथमिक शिक्षक संघटऩेचे नेते माजी आमदार शिवाजीराव दत्तात्रय पाटील (वय ९०) यांचे रविवारी पहाटे ४ वाजता उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या पंधरा दिवसापासून कोल्हापूर येथील अँस्टर आधार हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू  होते. रविवारी सायंकाळी पाच वाजता त्यांच्या मुळ गावी येलूर ता.वाळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यभर ते शिक्षक नेते शि.द.पाटील या नावाने परिचित होते. त्यांचे निकटवर्तीय त्यांना 'शि. द. अण्णा' या नावाने ओळखायचे.

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर लढणारे नेतृत्व पडद्याआड

सांगली जिल्ह्यातील येलूर (ता. वाळवा) या गावी ३० मे १९३० रोजी शि.द.पाटील तथा अण्णांचा जन्म झाला. शिक्षकी पेशा नेटाने करत असताना प्राथमिक शिक्षण व शिक्षणाबद्दलची आस्था असणाऱ्या पाटील यांनी शिक्षक संघाच्या माध्यमातून आपल्या सामाजिक कार्याची सुरवात केली. अमोघ वक्तृवशैली, तालमीत कमावलेले भरदार शरीर, अभ्यासू, रांगडी पण मुद्देसुर मांडणी या जोरावर अण्णांनी प्राथमिक शिक्षकांचे अनेक जटील प्रश्न संघटन कौशल्याच्या बळावर मार्गी लावले. आज पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास हा बुलंद तारा निखळला. गेली ४६ वर्षे ते देशातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नावर शासन व प्रशासन यांच्याशी संघर्ष केला. ४० लाख शिक्षकांचे एकमुखी नेतृत्व केले.

फिलीपाईन्स येथील परिषदेत त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले

अखिल भारतीय शिक्षक संघाचे नेते म्हणून देश पातळीवर त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले. त्यांनी १९७५ ते १९९४ या कालावधीत राज्याच्या शिक्षक संघाचे अध्यक्ष म्हणून काम करताना शिक्षकांची संघटना बांधली. त्यांच्या संघटना बांधनीच्या कौशल्यामुळेच त्यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ते १० फेब्रुवारी २००२ ला आखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या जनरल कौन्सील मध्ये महासंघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. तर २२ एप्रिल २००२ मध्येच त्यांची विधान परिषद सदस्य म्हणून निवड झाली होती. फिलीपाईन्स येथे १९७९ साली झालेल्या जागतिक शिक्षक परिषदेत त्यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले होते.

 त्यांच्या पश्चात तीन मुले, एक विवाहित मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच राज्याच्या विविध भागातून त्यांचे शिक्षक कार्यकर्ते त्यांच्या अंत्यदर्शनासाठी येलूर येथे येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT