पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर शहर झाले शिवमय...

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - परंपरेप्रमाणे सोमवारी (ता.६) होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध ठिकाणी शिवजयंती सोहळ्याचे आयोजन केले आहे. सोहळ्यांतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धांना प्रारंभ झाला आहे. भगव्या पताका, झेंड्यांनी शहर शिवमय झाले आहे. 

दरम्यान, शिवजयंतीनिमित्त बाजारपेठेत भगव्या पताका, झेंडे आणि पुतळ्यांना मागणी वाढली आहे. बाजारगेट, मिरजकर तिकटी, ताराबाई रोड, पापाची तिकटी, पानलाईन परिसरात खरेदीसाठी गर्दी होवू लागली आहे. मंगळवार पेठेतील राजर्षी शाहू तरूण मंडळाच्या उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. हलत्या देखाव्याच्या उद्‌घाटनाबरोबरच धनगरी ढोलवादन रंगले. ‘जातीभेद गाडा, भारत देश जोडा’ असा संदेश यंदाच्या उत्सवातून दिला जाणार आहे.  

संयुक्त रविवार पेठेतर्फे भव्य चित्ररथ
संयुक्त रविवार पेठ मंडळाच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दहा वर्षांपासून रविवार पेठ भागातील ७० ते ८० मंडळे एकत्र येऊन संयुक्तरित्या ही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. यंदाही ३ ते ६ मे दरम्यान उत्सव साजरा होणार आहे. 

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते उत्सव सोहळ्याचे उद्‌घाटन होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्रवीण सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

संयुक्त बुधवार पेठेचा उत्सव आजपासून
संयुक्त जुना बुधवार पेठ सेवाभावी संस्थेतर्फे तोरस्कर चौकात आज (ता. ३)पासून तोरस्कर चौकात शिवजयंती सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. रात्री आठला पंचरत्न शाहिरी पथक, शाहीर धोंडिराम मगदूम, शाहीर प्रकाश लोहार, शाहीर शंकर पाटील, शाहीर निवृत्ती कुंभार, शाहीर भिकाजी खिरूगडे यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम होईल. शनिवारी (ता. ४) अंतरंग वाद्यवृंद, रविवारी (ता. ५) सायंकाळी पाचला शिवमय मोटारसायकल फेरी, कुर्लीच्या सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल. सोमवारी (ता. ६) सकाळी शिवजन्मकाळ, त्यानंतर रक्तदान शिबिर, रात्री आठला परिसरातील ज्येष्ठ कलाकारांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (ता. ७) भव्य मिरवणूक होईल.

स्वातंत्र्यदिन संचलनातील शिवाजी महाराजांचा भव्य चित्ररथ आणि तांत्रिक देखावा हे यंदाच्या उत्सवाचे विशेष आकर्षण आहे. कोल्हापुरात प्रथमच भव्य २० बाय ९० पिक्‍सल व्हिडिओ लाईट सिस्टीम पहायला मिळणार आहे. ऐतिहासिक तलवारी, विविध शस्त्रे यांचे शस्त्र,नाणी, पुस्तके प्रदर्शन, शिवाजी महाराजांची प्रतिकृती असणारे टी शर्ट, टॅटू, स्टॉल्स ऐतिहासिक पोवाडा, लहान मुलांसाठी ऐतिहासिक वेशभूषा स्पर्धा, अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला आतषबाजी करण्यात येणार आहे. 

मुख्य दिवशी सोमवारी (ता. ६) सकाळी जन्मकाळ व सुंठवडा वाटप करण्यात येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी  वाजता छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकीचे केरळचे वाद्यवृंद आकर्षण ठरणार आहे.

पारंपारिक वेशभूषेसह, लेझीम ढोल पथक व इतर वाद्य त्याचप्रमाणे फेटा बांधलेल्या महिलांचा लक्षणीय सहभाग असणार आहे. या माध्यमातून संकलित निधीपैकी उर्वरित सर्व निधी गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व आरोग्य विमा यासाठी देण्यात येणार आहे. यावेळी अजित गायकवाड, मोहन पोवार, सुनील खोत, बाळासाहेब मुधोळकर, गजानन तोडकर, रवींद्र पाटील, विनायक चंदूगडे, संजय तोरस्कर, महेश ढवळे, रतन हुलस्वार आदी उपस्थित होते.

राजारामपुरीत उद्यापासून उत्सव
संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव समितीतर्फे शनिवार (ता.४) पासून शिवजयंती सोहळ्याला प्रारंभ होणार आहे. सकाळी दहा वाजता शिवाजी महाराजांची मूर्ती आगमन सोहळा होईल. जनता बझार ते राजारामपुरी तालीम या मार्गावरून मिरवणूकीने मूर्तीचे आगमन होईल. सायंकाळी सहा वाजता यशस्वी महिलांचा जिजाऊ पुरस्काराने गौरव होईल. त्यानंतर साडेसात वाजता शाहिर रंगराव पाटील यांचा ‘मुद्रा भद्राय राजते’ हा कार्यक्रम होईल. 

रविवारी (ता.५) सकाळी स्केटींग रॅली, रक्तदान शिबिर आणि सायंकाळी सहाला शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांचे व्याख्यान व त्यानंतर गोरक्षनाथ कालेकर निर्मित ‘सह्याद्रीचा सिंह गर्जतो’ हा कार्यक्रम होईल. सोमवारी (ता.६) सायंकाळी चारला भव्य मिरवणुकीला प्रारंभ होईल. शिवाजी महाराजांची मेघडंबरीतील मूर्ती, आम्ही कोल्हापूरकर ढोलपथक, मर्दानी खेळ, मल्लखांबाची प्रात्यक्षिके, शिवचरित्रावर आधारित देखावे, एलईडी स्क्रीनवरून थेट मिरवणूकीचे प्रक्षेपण ही यंदाच्या मिरवणुकीची वैशिष्ट्ये असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT