shivsena gives candidacy to other who are recently enters in shivsena
shivsena gives candidacy to other who are recently enters in shivsena 
पश्चिम महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : पक्षनिष्ठ घरी अन्‌ शिवसेनेची आयारामांना उमेदवारी

तात्या लांडगे

सोलापूर : भाजपने दिग्गजांना डावलून कॉंग्रेस- राष्ट्रवादीतून पक्षांतर केलेल्यांना उमेदवारी दिली तर शिवसेनेनेही त्याच पावलावर पाऊल
टाकत पक्षनिष्ठांना डावलून ऐनवेळी पक्षात आलेल्यांनाच उमेदवारी दिली आहे. करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या रश्‍मी बागलांना तर मोहोळमध्ये मनोज शेजवालांना डावलून नागनाथ क्षिरसागर यांना तर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याऐवजी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांना उमदेवारी दिली आहे.

2014 च्या मोदी लाटेतही शिवसेनेला एकमेव यश मिळवून दिलेल्या नारायण पाटलांना शिवसेनेने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारली. जुन्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांची मागणी असतानाही पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना डावलले. तर उमेदवारीच्या आशेने महेश कोठे मागील चार- पाच दिवसांपासून मुंबईतच मुक्‍कामी असतानाही त्यांच्याऐवजी कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्यावर विश्‍वास दाखविला. मोहोळ विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीत मोठी मते घेऊनही यंदा मनोज शेजवाल यांना शिवसेनेने डावलले आहे. त्यामुळे पक्षनिष्ठ आता पक्षाविरोधात बंडखोरीच्या तयारीला
लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

नाराजांवर आघाडीचा नेम
पक्षनिष्ठपणे पक्षाचे काम करुनही मोहोळ विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेले मनोज शेजवाल यांना यंदा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्‍वास असतानाच ऐनवेळी पक्षात प्रवेश केलेल्या नागनाथ क्षिरसागर यांना उमेदवारी मिळाली. त्याचाच प्रत्यय करमाळा अन्‌ शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आला. या निष्ठावंत नाराजांचा शोध घेत आघाडीसह अन्य पक्षांनी त्यांच्याशी संपर्क वाढवला असून नाराज इच्छूकांनीही आता आघाडीसह अन्य पक्षातून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. उमदेवारी अर्ज भरण्यासाठी आता दोन दिवस शिल्लक असतानाच हालचालींना वेग आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

तयारी झालेली पण पायलट घाबरले... पवारांच्या बंडाबद्दल पहिल्यांदाच खुलासा; पटेलांनी सांगितली राष्ट्रवादीची जन्मकथा

ICC: आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्ट किती शक्तीशाली आहे? नेतन्याहूंविरोधात अटक वॉरंट जारी केल्यास काय होणार?

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Latest Marathi News Live Update: छत्तीसगडमध्ये अँटी-नक्षल ऑपरेशन सुरू; १० नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात

SCROLL FOR NEXT