maruti chavan.jpeg
maruti chavan.jpeg 
पश्चिम महाराष्ट्र

धक्कादायक....येथील जवानाचे अरूणाचल प्रदेशात सेवा बजावताना निधन 

सकाळवृत्तसेवा

एरंडोली (सांगली)- पायापाचीवाडी (ता. मिरज) येथील जवान मारुती माहिपती चव्हाण (वय 38) हे भारतीय सैन्यदलात सेवा बजावत असताना अरुणाचल प्रदेश येथे त्यांचा हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. 

पायापाचीवाडी येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले मारुती चव्हाण हे 2002 साली भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. 9-मराठा बटालियन इन्फंट्रीत हवालदार या पदावर कार्यरत होते. त्यांनी देशात व परदेशात आपली सेवा बजावली आहे. अरुणाचल प्रदेश येथे सेवा बजावत असतानाच त्यांना काल पहाटे पाच वाजता छातीत दुखू लागले. त्यातच हृदयविकाराचा धक्‍क्‍याने त्यांचा मृत्यू झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चव्हाण यांना सैन्यदलात सेवा करण्याची फार इच्छा होती.

17 वर्ष 6 महिने सेवा झाल्यानंतर सेवानिवृत्ती न घेता दोन वर्षांपूर्वी आणखी दोन वर्षे सेवा वाढवून घेतली. पुढील वर्षी 2021 ला सेवानिवृत्त होणार होते. त्या आधीच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या निधनामुळे पायापाचीवाडी गावावर शोककळा पसरली आहे. त्यांना दोन मुले असून आई, वडील शेती करतात. त्यांच्या निधनाची माहिती मिरजेच्या तहसीलदारानी पायापाचीवाडी चे ग्रामसेवक श्री. साळुंखे यांना दिली. 


श्री. चव्हाण यांचे पार्थिव गुवाहाटी येथून विमानाने बुधवारी पहाटे येणार आहे. त्यानंतर सैन्यदलाच्या खास गाडीतून त्यांच्या मूळ गावी पायापाचीवाडी येथे सकाळी पार्थिव आणले जाईल. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन सुरू असून गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे काळजी घेण्यासाठी गाव कामगार तलाठी प्रतिभा धुमाळ, आपत्ती व्यवस्थापन समिती, सरपंच, पोलिस पाटील यांनी गर्दीत न करता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील असे सांगितले. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bima Bharati: आधी सुपारी अन् हत्येनंतर दिली मटण पार्टी; पाच वेळच्या महिला आमदाराच्या लेकाची पळापळ

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर बंद; BSE मार्केट कॅप प्रथमच 437 लाख कोटींच्या पुढे

Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या राजकारणात ट्विस्ट; ममता बॅनर्जींनी घेतली 'या' भाजप नेत्याची भेट

Haris Rauf Viral Video: भारतीय चाहता समजून पाकिस्तानी खेळाडू गेला अंगावर धावून मात्र... Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi Live Updates: वर्षा गायकावड यांनी दिला आमदारकीचा राजीनामा

SCROLL FOR NEXT