ahilyadevi-holkar SOLAPUR UNIVERCITY 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक...'या' विद्यापीठाच्या सर्व्हर लॅबला ठोकले कुलूप 

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नावे परस्पर उघडलेल्या लॉगिन आयडीतून 15 नापास विद्यार्थ्यांना पास केल्याचे सत्यशोधन समितीने उघड केले. त्यात वाढ होण्याची शक्‍यता असल्याने परीक्षा विभागातील संगणकाची सर्व्हर लॅब सीलबंद केली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार पोलिसांत तक्रार नोंदवली असून पोलिसांच्या अहवालानुसार या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी पुण्यातील सायबर फॉरेन्सिक लॅबद्वारे केली जाणार आहे. 


कोणत्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका कोणत्या महाविद्यालयास तथा प्राध्यापकाकडे द्यायच्या, नापास विद्यार्थ्यांकडून प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी किमान 15 ते 25 हजार रुपये घेऊन पास करायचे, असे सोलापूर विद्यापीठातील प्रकार सातत्याने उजेडात आले. एमबीएच्या नापास विद्यार्थ्यांना गुण वाढविताना उत्तरपत्रिकेवर खाडाखोड न करताच एकूण बेरीज वाढवून पास करण्याची शक्‍कलही पाहायला मिळाली. आता चक्‍क कुलगुरू डॉ. फडणवीस यांच्या परस्पर लॉगिन आयडी तयार करून फार्मसीच्या नापास विद्यार्थ्यांना पास केल्याचे समोर आले आहे. परंतु, कुलगुरूंच्या परवानगीनेच लॉगिन आयडी तयार केल्याचे स्पष्टीकरण तत्कालीन परीक्षा नियंत्रक डॉ. कोकरे यांनी दिले आहे. आता हे प्रकरण राज्यपालांपर्यंत पोचले असून त्यांच्या सूचनेनुसार उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. 


ठळक बाबी... 

  • सत्यशोधन समितीचा अहवाल राजभवनाला केला सादर 
  • सोलापूर विद्यापीठातील परीक्षा विभागाच्या सर्व्हर लॅबला ठोकले कुलूप 
  • नापास विद्यार्थ्यांना पास करण्यात मोठा आर्थिक व्यवहाराचा संशय 
  • जानेवारी ते जून 2019 या कालावधीतील सीसीटीव्ही फुटेज पडताळणीचे निर्देश 
  • तीन कर्मचाऱ्यांची परीक्षा विभागातून हकालपट्टी : एमकेसीएलचा प्रतिनिधी पुण्याला रवाना 
  • कुलगुरूंच्या लॉगिन आयडीतून नापास विद्यार्थ्यांना पास केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल 


परीक्षा विभागाची सर्व्हर लॅब सीलबंद 
कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या परस्पर तयार केलेल्या लॉगिन आयडीतून फार्मसीच्या नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्‍तींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी, सत्यशोधन समितीचा अहवाल राजभवनाला सादर केला असून आता परीक्षा विभागातील सर्व्हर लॅब सीलबंद करण्यात आली आहे. 
- डॉ. श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, सोलापूर विद्यापीठ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Plant Care in Summer: कडक उन्हात बाग वाचवायची कशी? जाणून घ्या सोपे उपाय!; उन्हाळ्यात झाडांची ‘तहान’ भागवा

Latest Marathi News Live Update : खरातची अज्ञातस्थळी चौकशी, एसआयटीने चौकशीचं ठिकाण बदललं

लग्नाला बोलावलं नाही म्हणून रुसलेली चाहती, रश्मिका-विजयने घरी बोलावून केला तिच्या आवडीचा 'खास' बेत, Viral Video

Dharashiv News: अवकाळी पाऊस-गारपीटीचा फटका; द्राक्ष, कलिंगड दर कोसळले; १६० रुपयांवरून ७० रुपयांवर द्राक्ष; शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान

SCROLL FOR NEXT