Shubham Shelke president of Maharashtra Integration Oppression from karnataka police Youth Committee  
पश्चिम महाराष्ट्र

कर्नाटकी पोलिसांकडून समितीच्या युवा कार्यकर्त्यांवर दडपशाही

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव - सीमाप्रश्न कोण सोडविणार आहे, न्यायालय की तू ?असे विचारत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना चौकशीसाठी बोलावून पोलिसांकडून दादागिरी करण्यात येत आहे. शेळके यांना मार्केट पोलीस ठाण्यात बोलावून दोन तासापेक्षा जास्त काळ बसवून ठेवण्यात आले आहे. या प्रकाराबाबत मराठी भाषिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कर्नाटकी पोलिसांचा पोटशूळ

गेल्या काही दिसवांपासून मराठी भाषिकांवर विविध प्रकारे अन्याय करू पाहणाऱ्या कर्नाटकी पोलिसांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या अध्यक्षाना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

शुभम शेळके यांनी युवा समितीच्या माध्यमातून सीमाप्रश्नी आणि मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पोटशूळ उठलेल्या कर्नाटकी पोलिसांनी शुभम शेळके यांना दोन तासांहून अधिकवेळ पोलीस स्थानकात बसवून ठेवले आहे. तसेच यापुढे सीमाप्रश्नी आवाज चालणार नाही अशी धमकी दिली जात असून पोलीस स्थानकासमोर युवा कार्यकर्त्यानी गर्दी करण्यास सुरवात केली आहे. युवा समितीच्यावतीने आज सकाळी बॅ नाथ पै चौकात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर शेळके यांना मार्केट पोलीस स्थानकात बसवून ठेवण्यात आले आहे.                                                 

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र हेच ध्येय आणि अंतिम लक्ष आहे त्यामुळे पोलिसांनी कितीही वेळ पोलीस स्थानकात बसविले तरी घाबरणार नाही शेवटी विजय आपलाच आहे                     शुभम शेळके, अध्यक्ष महाराष्ट्र एकीकरण युवा समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT