Shweta Patil
Shweta Patil Sakal
पश्चिम महाराष्ट्र

चिक्कोडीच्या श्वेता पाटील पहिल्याच प्रयत्नात बनल्या न्यायाधीश

सकाळ वृत्तसेवा

चिक्कोडी शहरातील श्वेता बी. पाटील यांनी कायदा विभागात पदवी घेतल्यानंतर कमी वयातच त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली आहे.

- अजित सुतार

चिक्कोडी - शहरातील श्वेता बी. पाटील (Shweta Patil) यांनी कायदा विभागात पदवी घेतल्यानंतर कमी वयातच त्यांची न्यायाधीशपदी (Judge) निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे कौतूक होत असून चिक्कोडीच्या (Chikkodi) शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

शहरातील बी. डी. पाटील यांच्या कन्या श्वेता पाटील या लहानवयापासूनच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करीत आल्या आहेत. कठोर परिश्रम, निरंतर अभ्यासामुळे आपल्या आई, वडिलांचे स्वप्न साकार करत कमी वयातच न्यायाधीश पदावर विराजमान झाल्या आहेत. श्वेता यांनी पहिल्यांदाच न्यायाधीश निवडीची परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात 28 वा क्रमांक मिळविला. निरंतर अभ्यासामुळे पहिल्या प्रयत्नातच न्यायाधीश होऊन त्या इतरांसाठी मॉडेल बनल्या आहेत.

आई, वडील, काका, ज्येष्ठ शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळेच मी हे यश गाठू शकले आहे, असे श्वेता पाटील यांनी सांगितले. महिलांना संधी दिल्यास त्या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतात, याचे हे उत्तम उदाहरण आहे. श्वेता यांनी आपले प्राथमिक शिक्षण बी. डी. जत्ती प्राथमिक शाळा-बंगळूर येथे पूर्ण केले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण केएलई माध्यमिक शाळा-निपाणी आणि कायदा पदवी सिरीबोसिस लॉ कॉलेज-हैदराबादमधून घेतले. सतत अभ्यास करण्याची इच्छा असल्यामुळेच त्यांची लहान वयातच न्यायाधीशपदी निवड झाली आहे. मुलीच्या या यशाबद्दल वडील चिक्कोडीतील वकील बी. डी. पाटील यांनी समाधान केले.

`कायदा पदवीला असताना काहीतरी वेगळे करावे, अशी आपली इच्छा होती. निरंतर अभ्यास आणि सतत केलेल्या प्रयत्नामुळे पहिल्याच प्रयत्नात 28 वा क्रमांक मिळवून न्यायाधीश पदासाठी निवड झाली. आपले आई, वडील, काका आणि शिक्षकांच्या पाठिंब्यामुळे हे यश गाठण्यास सहकार्य ठरले. स्वप्न साकार झाल्याबद्दल खूप आनंद झाला आहे.`

- श्वेता बी. पाटील, नूतन न्यायाधीश, चिक्कोडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT