sister register brother name in police station for crime case of money 
पश्चिम महाराष्ट्र

भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा; सख्या बहिणीनेच दिली फिर्याद, सांगलीतील घटना

सकाळ वृत्तसेवा

सांगली : शहरातील महावीरनगर येथील बॅंकेतून वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने पेन्शन व बचत खात्यातील २१ लाख ६० हजारांची रक्कम परस्पर काढून घेतल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला. सख्या बहिणीने भावाविरोधात फिर्याद दिली. अनंतराज ऊर्फ सतीश धनंजय बेलापुरे (रा. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. उज्ज्वला शीतल पाटील (वय ४७ रा. महावीर पार्क कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली.  

या संपूर्ण घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी उज्ज्वला पाटील आणि संशयित अनंतराज ऊर्फ सतीश धनंजय बेलापुरे हे दोघेही सख्खे भाऊ बहीण आहेत. उज्ज्वला या लग्नानंतर कोल्हापूर येथे गेल्या.त्यांचे वडील धनंजय रामचंद्र बेलापूरे यांचे निधन झाले. त्यानंतर अनंतराज याने वडिलांची पेन्शन आणि बचत खात्यातील २१ लाखांची रक्कम परस्पर काढून घेतली. २० नोव्हेंबर ते १ डिसेंबर २०२० या कालवधीत महावीरनगर येथील सेंट्रल बॅंक ऑफ इंडियातून पैसे काढून घेतले. 

बहिणीस न विचारता पैसे काढून घेतल्याचे समोर आले. त्यानंतर उज्ज्वला पाटील यांनी शहर पोलिंसांत फिर्याद दिली. त्यानुसार भावाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT