smart city department has a good plan to install solar energy equipment. But the contractor has not been found yet in belgum 
पश्चिम महाराष्ट्र

बेळगावातील 'तो' प्रकल्प चांगला, पण त्याला ठेकेदारच मिळेना...

सकाळवृत्तसेवा

बेळगाव - बेळगावातील सरकारी कार्यालयांच्या इमारतीवर सौर उर्जा उपकरण बसविण्याची स्मार्ट सिटी विभागाची योजना चांगली आहे. पण या योजनेसाठी स्मार्ट सिटी विभागाला अद्याप ठेकेदारच मिळालेला नाही. ठेकेदार शोधण्यासाठी चौथ्यांदा निविदा काढण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्मार्ट सिटी विभागाला एका विकासकाची गरज आहे. त्या विकासकानेच या योजनेचा आराखडा तयार करावा, त्यासाठी आर्थिक गुंतवणूक करावी, आवश्‍यक उपकरणांचे उत्पादन व पुरवठा करावा, उकरणे बसवून त्यांची चाचणी घ्यावी अशी अट आहे.

उपकरणे सरकारी कार्यालयांच्या छतावर बसविण्यात आल्यानंतर त्या माध्यमातून सौर उर्जेचे उत्पादन व या योजनेची देखभालही विकासकाला करावी लागणार आहे. हा ठेका 25 वर्षांसाठी दिला जाणार आहे. ही योजना 2 कोटी 35 लाख रूपयांची आहे. एवढी गुंतवणूक विकासकालाच करावी लागणार आहे. स्मार्ट सिटीच्या ज्या योजना बेळगाव शहरात राबविल्या जाणार आहेत, त्यातील बहुतेक पीपीपी त्वावरील आहेत. म्हणजे या योजनांसाठी ठेकेदार किंवा विकासकांनीच आर्थिक गुंतवणूक करावी. ठराविक वर्षे त्या योजनेची देखभाल करून ती स्मार्ट सिटी विभाग किंवा महापालिकेकडे ती हस्तांतरीत करावी. सौर उर्जा उत्पादनाची ही योजनाही विकासकाला 25 वर्षे सांभाळावी लागेल. त्यातून मिळणारे उत्पन्न विकासकाला मिळेल. स्मार्ट सिटी योजनेतील बहुउद्देशीय व्यापारी संकुलांचे कामही याच पद्धतीने केले जाणार आहे. त्यासाठी अनेकदा निविदा काढूनही प्रतिसाद मिळालेला नाही ही वस्तुस्थिती आहे. बेळगाव शहरात अनेक शासकीय इमारती आहेत. या इमारतींच्या छतावर सौर उर्जेचे उपकरण बसवून त्या माध्यमातून सौर उर्जेचे उत्पादन करता येणार आहे. या सौर उर्जेची खरेदी हेस्कॉमकडून केली जाणार आहे.

अपारंपारीक उर्जेच्या उत्पादनाला यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. बेळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. पण शासकीय इमारतींच्या छतावर अशा प्रकारचा प्रकल्प किंवा योजना राबविण्याची ही पहिलीच वेळ आहे. स्मार्ट सिटी विभागाने चौथ्यांदा निविदा काढून अर्ज मागविले आहेत. ही निविदा प्रक्रिया 3 ऑगस्ट रोजी पूर्ण होणार आहे. पण यावेळी तरी स्मार्ट सिटी विभागाला ठेकेदार किंवा विकासक मिळणार का? असा प्रश्‍न आहे. बेळगावात स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीला 25 जून रोजी चार वर्षे पूर्ण होणार आहेत. या योजनेसाठी 400 कोटी रूपयांचा निधी सप्टेबर 2016 मध्येच मिळाला आहे. पण योजनेतील मोजकीच कामे पूर्ण झाली आहेत. रखडलेल्या अनेक कामांमध्ये या सौर उर्जा प्रकल्पाचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेली रशियन महिला ८ वर्ष स्वयंपाक कशी करायची? मुलींना काय खायला द्यायची?

'26 निष्पापांच्या हत्यांमागे पाकिस्तानचा हात, त्या दहशतवाद्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणार'; जम्मूच्या उपराज्यपालांचा कडक इशारा

Walking 10000 Steps: दररोज 10,000 पावले चालल्यास काय होईल? डॉक्टरांनी सांगितले शरीरात दिसणारे 5 बदल

Gokul Milk Politics : आप्पा महाडिकांनी थेट मुश्रीफांनाच घेतलं अंगावर, कारभार चांगला, मग ‘टोकण’ कशासाठी?

Nagpur Crime: कर्जदाराचे अपहरण, जिवे मारण्याची धमकी; सावकारासह चौघांना अटक

SCROLL FOR NEXT