So far 1025 crore on two lakh loan accounts 
पश्चिम महाराष्ट्र

पावणेदोन लाख कर्ज खात्यांवर आतापर्यंत 1025 कोटी वर्ग! 

सकाळ वृत्तसेवा

नगरः  महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत आजअखेर जिल्हा सहकारी बॅंकेच्या एक लाख 76 हजार 639 कर्ज खात्यांवर 1024 कोटी 85 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. कर्ज वर्ग झाल्याच्या पावत्याही दिल्या जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. 


आधार व रकमांसंदर्भात प्रशासनाकडे दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण तहसील पातळीवर होत आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे. योजनेत नगर जिल्हा राज्यात आघाडीवर आहे. आधार प्रमाणीकरणासाठी दोन हजार बायोमेट्रिक मशिन प्रशासनाने जिल्हा बॅंकेच्या सर्व शाखा, आपले सरकार केंद्र येथे उपलब्ध केल्या आहेत.

आधार प्रमाणीकरणात दोन लाख 53 हजार 455 पैकी दोन लाख 14 हजार 693 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण निरंतर सुरू राहणार आहे, अशी माहिती सहायक निबंधक हरिश्‍चंद्र कांबळे यांनी दिली. 

बळिराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासन बांधील 
बळिराजाला दिलासा देण्यासाठी प्रशासन बांधील आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले नसेल, त्यांनी करून घ्यावे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात काही अडचणी येत असेल, तर त्यांनी जिल्हा समिती, तहसील पातळीवर संपर्क करावा.

जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी कर्जमुक्ती योजनेपासून वंचित राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Income Tax Notice Scam : तुम्हालाही इन्कम टॅक्सची नोटीस आलीय ? आजिबात करु नका 'ही' चूक, होईल मोठे नुकसान

झाकीर खानची तब्येत बिघडली! मुंबईच्या लीलावती रुग्णालयात केलं भर्ती, नक्की झालं काय?

Uri Encounter: अफगाणिस्तानवर हल्ल्यानंतर पाकड्यांचा मध्यरात्री उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न, भारतीय सैन्याने जाग्यावरच केलं ठार!

धक्कादायक! आधीच टंचाई त्यात गॅस सिलिंडरची चोरी, ७६ चोरले पण फक्त १२ भरलेले...

Ahmedabad Plane Crash : वैमानिकाच्या चुकीमुळे नाही तर 'या' मुळे घडली अहमदाबाद विमान दुर्घटना, अमेरिकेच्या तपास संस्थेचा दावा

SCROLL FOR NEXT