So many farmers got loan waiver in Shegaon 
पश्चिम महाराष्ट्र

इतक्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील उतरले कर्ज

सकाळ वृत्तसेवा

शेवगाव : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत तालुक्‍यातील 20 हजार 542 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्यांच्या आधार प्रमाणीकरणासाठी 108 ठिकाणी व्यवस्था केल्याची माहिती प्रभारी तहसीलदार असिमा मित्तल यांनी दिली. 

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत राज्य सरकारने एक एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2019 अखेर थकीत असलेल्या अल्प मुदतीच्या व पुनर्गठित पीककर्जाचे मुद्दल व व्याजाची एकूण दोन लाखांपर्यंत रक्कम माफ केली आहे. त्यात तालुक्‍यातील 20 हजार 542 शेतकरी पात्र ठरले असून, त्यांच्या कर्जखात्यांचा तपशील "अपलोड' झाला आहे. या शेतकऱ्यांना उद्यापासून (ता. 28) कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

त्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार कार्ड प्रमाणीकरण करावे, असे आवाहन प्रभारी तहसीलदार मित्तल व सहायक निबंधक अनिल भांगरे यांनी केले आहे. 
आधार प्रमाणीकरणासाठी जिल्हा सहकारी बॅंकेच्या 16 शाखा, राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या नऊ शाखा, आपले सरकार केंद्र व कॉमन सर्व्हिस सेंटर 83, अशा एकूण 108 ठिकाणी सोय केली आहे.

केंद्रात जाताना आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कर्ज थकबाकीचा तपशील, संस्थेची पावती सोबत न्यावी, असे आवाहन तहसीलदार मित्तल यांनी केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alephata News : ‘जीव देऊ, पण वडिलोपार्जित जमीन नाही’; कल्याण-लातूर महामार्गाला माळवाडी ग्रामस्थांचा विरोध, शासन-शेतकरी संघर्ष पेटण्याची चिन्हे

9 September 2026 Numerology Prediction : 9 सप्टेंबरचा दुर्मिळ योग! सूर्य, मंगळ अन् बुधाच्या कृपेने 'या' 3 मूलांकांना मिळणार बंपर पैसा, नव्या संधींचे मार्ग होणार खुले?

मानसवेध : मानसिक ताकद वाढविण्यासाठी

Soyabean Medu Vada: घरात उडीद डाळ नाही? टेन्शन नको! 10 मिनिटांत बनवा सोयाबीनपासून मेदू वडा; जाणून घ्या रेसिपी

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

SCROLL FOR NEXT