ddr office.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

बापरे...सांगली जिल्ह्यात एवढे सावकार वाढले

सकाळवृत्तसेवा

सांगली- जिल्ह्यात सामान्य नागरिकांना अडचणीच्या वेळी पतपुरवठा करणाऱ्या अनेक सहकारी पतसंस्था अडचणीत आहेत. गेल्या सहा वर्षांत जवळपास 150 पतसंस्थांनी गाशा गुंडाळला आहे. याच काळात 250 नोंदणीकृत सावकार वाढले आहेत. जिल्ह्यात सध्या 657 नोंदणीकृत सावकार आहेत. सद्य:स्थितीत नोकरदारांच्या 178 पतसंस्था आणि 909 ग्रामीण व नागरी पतसंस्था कार्यरत आहेत. अडचणीच्या काळातही अनेक पतसंस्थांनी आदर्श उपविधीप्रमाणे कामकाज करून सहकार जिवंत ठेवला आहे. 


सहकार पंढरी अशी ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात 25 वर्षांपूर्वी जवळपास दहा हजार विविध प्रकारच्या सहकारी संस्थांनी जाळे विणले होते. सामान्य माणसाला पाच-दहा हजार रुपयांपासून पतपुरवठा केला जात होता. "विना सहकार नाही उद्धार' असे समीकरण बनले होते. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' याप्रमाणे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागात विकासपर्व सुरू होते. राष्ट्रीयीकृत आणि इतर बॅंकांपेक्षा सहकारी पतसंस्थांमध्ये तत्काळ कर्जपुरवठा होत असल्यामुळे सहकारावर विश्‍वास होता. 


सहकारी संस्थांची भरभराट आणि सामान्य माणसांना विनासायास कर्जपुरवठा यामुळे चांगले दिवस सुरू असतानाच सहकारात स्वाहाकार शिरला. अनेक संस्थाचालकांनी विनातारण कर्जे वाटली. नातेवाइकांच्या नावावर स्वत: कर्जे उचलली. वसुलीचा प्रश्‍न गंभीर बनला. एनपीए थकबाकीचे प्रमाण वाढले. संस्था अडचणीत आल्या. काही संस्था अवसायनात गेल्या. नावाजलेल्या पतसंस्था बंद पडण्याचे प्रकार घडू लागताच ठेवीदारांनी तत्काळ ठेवी काढण्याचा सपाटा लावला. गेल्या 20 वर्षांत शेकडो ठेवीदारांना हक्काच्या पैशासाठी ग्राहक न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागला आहे. एकापाठोपाठ संस्था बंद पडत असतानाही सहकारातील अनेक संस्थांनी पारदर्शक कामकाज करून विश्‍वास कायम ठेवला आहे. त्यामुळे सहकार चळवळ आजही टिकून आहे. 


एकीकडे सहकारी पतसंस्था बंद पडण्याचा सिलसिला सुरू असताना दुसरीकडे सावकारांनी हातपाय पसरण्यास सुरवात केल्याचे चित्र गेल्या 20 वर्षांत दिसून येते. पतसंस्था बंद पडल्यामुळे अडचणीवेळी सावकारापुढे हातपाय पसरण्याशिवाय सामान्यांपुढे पर्याय नव्हता. त्यातून अनेकजण सावकाराच्या व्याज, चक्रवाढ व्याजाच्या चक्रव्युहात अडकले. गेल्या सहा वर्षांत जवळपास 150 पतसंस्थांना टाळे लागले, तर 250 सावकार वाढले. बेकायदेशीर सावकारांची संख्याही खूप मोठी आहे. 


व्याजाने फिरले 81 कोटी रुपये 
जिल्ह्यात मार्च 2018-19 अखेर नोंदणीकृत असलेल्या सावकारांची संख्या 657 इतकी आहे. या सावकारांनी बिगर व्यापारी 54 हजार 961 जणांना तर 129 शेतकऱ्यांना याप्रमाणे 55 हजार 90 जणांना गेल्या आर्थिक वर्षात 81 कोटी 30 लाख रुपये इतके कर्जवाटप केलेले आहे. त्यापैकी 41 कोटी 11 लाख रुपये कर्जवसुली करण्यात आली आहे. 


पतसंस्थांची तालुकावर संख्या 
मिरज तालुका- 266, कवठेमहांकाळ- 58, जत- 69, आटपाडी- 36, खानापूर-44, कडेगाव- 30, पलूस-77, तासगाव-47, वाळवा- 223, शिराळा- 59 अशी एकूण 909 पतसंस्था आहेत. 909 पैकी 635 ग्रामीण पतसंस्था, तर 274 नागरी पतसंस्था आहेत. नोकरदारांच्या पतसंस्था 178 इतक्‍या आहेत. 


""पतसंस्थांमध्ये ठेवी अडकल्यामुळे अनेक ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही ठेवीदार मृत झाले आहेत. पतसंस्थांकडे पैसे मागितले तर दादागिरीची भाषा केली जाते. बऱ्याच संस्था बंद असून, त्यांचे लेखापरीक्षण झालेले नाही. सहकार लेखापरीक्षण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सहकार आयुक्त अनिल कवडे यांना निवेदन दिले आहे. त्यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.'' 
- प्रदीप बर्गे, आधार ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT