social media viral video in sangli chicken shop hen and shop owner 
पश्चिम महाराष्ट्र

'तुला कापू का ? कोंबडी म्हणते नको नको' : हा व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

सकाळ वृत्तसेवा

सांगली : गेल्या काही महिन्यापासून बर्ल्ड फ्लूचे वारे जगभर पसरू लागले आहे. यातून मासांहार प्रेमींमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याभरात बर्ड फ्लूने धुमाकूळ घातला असताना मजेशीर व्हिडोओ व्हायरल होत आहे. या कोंबडीच्या व्हिडीओत तुला कापू का ? असं म्हणताच ही कोंबडी मात्र 'नको नको' म्हणते आहे असे दृश्य दिसत आहे. 

राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अशा अनेक ठिकाणी कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. याचा संसर्ग वाढू नये त्यामुळे पोल्ट्री फार्मवरील कोंबड्या नष्टही करण्यात आल्या आहेत. या सगळ्यात मात्र हा कोंबडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगली जिल्ह्यात पोल्ट्री फार्म व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे. येथूनच अंडी आणि कोंबड्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तसेच खवय्यांची संख्या जास्त असल्याने मासांहारावर ताव मारला जातो. मात्र खवय्यांनी भितीपोटी आस्वाद घ्यायचे कमी केले होते. यांच्या मनातील भिती दूर करण्यासाठी महापालिकेने चिकण पार्टीचे आयोजनही केले होते. मात्र सोशल मिडीयावरील या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. 

एका चिकण दुकानात मालकाने सुरा हातात घेऊन 'तुझे कापू क्या..' असं म्हणताच कोंबडी जोरजोरात मुंडी हलवत आहे. चक्क कोंबडीच 'मला कापू नका' असे म्हणत मुंडी हलवून सांगत आहे. दुकानमालक पुन्हा 'तुझे कापू क्या' असं विचारतो आणि परत कोंबडी तसंच करते. शेवटी दुकानमालकाने ही कोंबडी कापली नाही. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : कॅप्टन खरातचा 'गेम' ओव्हर! आयपीएस तेजस्वी सातपुते यांच्याकडे तपासाची सूत्रे; बड्यांचे धाबे दणाणले

IPL 2026 Marathi News: ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे माघार सत्र! दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद यांना धक्के; कारण काय तर

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

SCROLL FOR NEXT