पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरातील ` इतक्या ` सावित्रीच्या लेकींना  "कन्या कल्याण'चा लाभ 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः स्त्री जन्मदर वाढावा यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली "कन्या कल्याण' योजनेचा लाभ शहरातील 23 बालिकांना मिळणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार झाले असून लवकरच त्या प्रमाणपत्रांचे वाटप संबंधित लाभार्थींना केले जाणार आहे.  महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून ही योजना राबविली जात आहे. 

योजनेचा झाला मार्ग मोकळा
अतिशय चांगली असलेली ही योजना महापालिकेत आर्थिक निकषात अडकली होती. नेमकी मदत किती करायची याबाबत एकमत न झाल्याने सध्या हा प्रस्ताव  निर्णयाविना प्रलंबित होता. मात्र, त्यावर आता तोडगा निघाला आहे. एक मुलगी असलेल्यांना पाच हजार रुपये आणि दोन मुली असतील तर अडीच हजार रुपये द्यावेत, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल. संबंधित बालिका 18 वर्षे वयाची होईपर्यंत ही ठेव तिच्या नावावर असणार आहे.

अनेक योजना कागदावर राहण्याची शक्यता 
महिला व बालकल्याण समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक योजना या कागदावरच राहण्याची चिन्हे आहेत. महापालिका शाळांतील मुलांना टॅब देण्याचेही नियोजन समितीने केले होते. मात्र, फक्त 20 लाख रुपये उपलब्ध केले जातील, असे आयुक्तांनी सांगितल्याने या योजनांची अंमलबजावणी झाली नाही. कन्या कल्याण योजना, स्त्री-जन्माचे कौतुक आणि मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महिला  व बालकल्याण समितीची ही योजना आहे. या योजनेचे गांभीर्य न समजलेल्या समितीतील पदाधिकाऱ्यांनी ती गुंडाळण्याचे नियोजन केले होते.  त्यासाठी लाभार्थी मिळत नसल्याचे कारण देण्यात आले होते. आता लाभार्थी उपलब्ध आहेत, यादीही तयार आहे. त्यानुसार निधीचे वाटप होणार आहे. 

या आहेत आणखीन योजना 
- गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृह बांधणे 
- विडी कामगार महिला व मुलींसाठी व्यावसायिक प्रशिक्षण 
- महिलांसाठी समुपदेशन केंद्राची उभारणी 
- पाळणाघरांना आर्थिक मदत करणे 
- मुलींना स्वयंसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy : मोहम्मद शमीने टप्पात कार्यक्रम केला; MS Dhoni चा पठ्ठ्या शतक झळकावून एकटा नडायला गेला, पण...

Latest Marathi News Live Update : इचलकरंजी एसटी आगार मालामाल! दिवाळीत १ कोटी १२ लाख उत्पन्न जमा

Body Impact Less Sleep: तुम्हीही रात्री फक्त 2 तास झोपताय? जाणून घ्या शरीरावर काय परिणाम होतात

Honesty Story : 'ओवीने प्रामाणिकपणे परत केला सुवर्णहार'; खेळताना सापडला पाच तोळे सोन्याचा हार

Electric Shock: सिव्हर टॅंक रिकामे करताना हेल्परचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; तिघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT