Pandharpur Kartiki Ekadashi Central Railway Solapur esakal
पश्चिम महाराष्ट्र

भाविकांसाठी खुशखबर! कार्तिकी एकादशीनिमित्त धावणार विशेष गाड्या; मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून नियोजन

पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंढरपूर-मिरज-पंढरपूर दरम्यान २०, २१, २५ व २७ नोव्हेंबर रोजी चार फेऱ्यांमध्ये गाड्या धावतील.

मिरज : मध्य रेल्वेच्या (Central Railway) सोलापूर विभागाकडून (Solapur Division) पंढरपूर येथील कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. मिरज-कुर्डुवाडी, मिरज-पंढरपूर आणि पंढरपूर-मिरजदरम्यान २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत विशेष गाड्या धावतील.

पंढरपूर-मिरज-पंढरपूर दरम्यान २०, २१, २५ व २७ नोव्हेंबर रोजी चार फेऱ्यांमध्ये गाड्या धावतील. गाडी क्रमांक ०१४४३ पंढरपूर येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटून मिरजेत दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. त्याच दिवशी मिरज-पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४४ मिरजेतून दुपारी १ वाजून १० वाजता सुटून पंढरपूर येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल.

तर मिरज-पंढरपूर-मिरज ही विशेष गाडी २१ ते २५ नोव्हेंबर रोजी चार फेऱ्यांत धावणार आहे. मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक (०१४४५) मिरजेतून सकाळी ८ वाजता सुटेल व पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४६ पंढरपूर येथून सकाळी ११ वाजता सुटेल. मिरज येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. मिरज-कुर्डुवाडी-मिरज गाडी २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत चार फेऱ्यांत धावणार आहे.

मिरज-कुर्डुवाडी गाडी क्रमांक ०१४४७ मिरजेतून दुपारी ४ वाजता सुटून कुर्डुवाडी येथे रात्री ८ वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल. तर कुर्डुवाडी-मिरज ०१४४८ ही गाडी कुर्डुवाडी येथून रात्री ९ वाजता सुटून मिरज येथे रात्री १ वाजता पोहोचेल. आरग, बेळंकी, सलगरे, कवठेमहांकाळ, लंगरपेठ, ढालगाव, जतरोड, मसोबा डोंगरगाव, जवळे, वासुद, सांगोला थांबे आहेत.

एकादशीला मिरजेतून गाड्या

  • मिरज-पंढरपूर दरम्यान २० ते २७ पर्यंत सकाळी ८, दुपारी १ वाजून १० मिनिटांनी, दुपारी ४

  • पंढरपूर-मिरज दरम्यान २० ते २७ पर्यंत सकाळी ९ आणि ११

  • मिरज-कुर्डुवाडी दरम्यान २१ ते २४ पर्यंत दुपारी ४

  • कुर्डुवाडी-मिरज दरम्यान २१ ते २४ पर्यंत रात्री ९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: विराट कोहली इतिहास घडवणार? सचिन तेंडुलकरला मागे टाकत ३ वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

Numerology for Pets: कुत्रा, मांजर, मासे की पक्षी? अंकशास्त्रानुसार पाहा तुमच्या मूलांकासाठी कोणता प्राणी आहे लकी...

Indian Army: पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या भारताच्या ड्रोनवर अमेरिकेची नजर; युद्ध सरावादरम्यान काय घडलं?

दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचा थेट CM Devendra Fadnavis यांना सवाल

कोल्हापुरात मिरवणुकीत तणाव; दोन गट भिडले, लोकांची धावपळ

SCROLL FOR NEXT