पश्चिम महाराष्ट्र

सोलापूरच्या नगरसेवकांना "या' समितीचे दरवाजे यंदाही बंद 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर ः महाराष्ट्र महापालिका कायद्यातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीपूर्वी या समितीचे सदस्य निवडणे बंधनकारक आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या महापालिका सभेत सदस्य निवडीसंदर्भात विषय येऊ शकतो. मात्र महापालिका या समिती सभापती पदाचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. गेल्या दोन वर्षांत समितीची एकही सभा झाली नाही. त्यामुळे 2018-19 मध्ये या समितीत पहिल्यांदाच आलेल्या सदस्यांना समितीच्या कामकाजात सहभागी होता आले नाही. दरम्यान, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्यापासून अनेक न्यायाधीश बदलले, मात्र अद्याप निकाल लागला नाही. त्यामुळे यंदाही हा विषय अजेंड्यावर येणार की नाही याबाबत उत्सुकता आहे. 

फेब्रुवारीत निवड होणे बंधनकारक 
स्थायी समिती सभापतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. आतापर्यंत अनेक न्यायाधीश बदलले, तरी निकाल न लागल्याने समितीतील सदस्यांमधील उत्सुकताही आता संपत आली आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) न्यायालयात याचा काहीतरी निकाल लागेल या अपेक्षेने नगरसेवक होते. मात्र सुनावणीच 28 फेब्रुवारीला गेल्याने इच्छुकांचा भ्रमनिराश झाला आहे. महापालिका स्थायी समितीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी देव पाण्यात ठेवलेल्या नगरसेवकांसाठी समितीचे दरवाजे यंदाही बंद राहणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर आता 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार 20 फेब्रुवारीच्या आत आठ सदस्यांची निवड करणे बंधनकारक आहे. 

निमित्त न्यायप्रविष्ठ बाबीचे 
स्थायी समिती सभापती निवडीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याचा निकाल लागेपर्यंततरी कायद्यातील तरतुदींनुसार समितीचा कारभार चालणे आवश्‍यक आहे. स्थायी समितीची सभा आठवड्यातून एकदा झालीच पाहिजे याचे बंधन आहे. मात्र, सभापती नाही म्हणून गेल्या दोन वर्षभरात एकही सभा बोलावली नाही. बहुतांश नगरसेवक नवीन असल्याने समितीच्या नियमांबाबत तेही जागरूक नाहीत. सभापतीचे पद रिक्त असेल तर हंगामी सभापती नियुक्त करण्याची तरतूद अधिनियमात आहे, मात्र न्यायप्रविष्ठ बाब असल्याचे कारण देत सभापती निवडणूक घेण्यात आली नाही. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Schemes: महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत हृदय व कर्करोग उपचारांसाठी रुबी हॉल क्लिनिकशी राज्य सरकारचा करार

Marathi News Live Updates : राज्यात होणार डॉक्टरांची मेगाभरती, आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Pimpri-Chinchwad Youth Rally: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वातंत्र्यदिनी युवाशक्तीचा जागर; ‘ओळख स्वतःची, जिद्द यशाची’च्या घोषणांनी १० लाईटहाऊस केंद्रांत जनजागृती रॅली

Tarique Rahman: तारिक रहमान भारत दौऱ्यावर येतील पण...; बांगलादेशने ठेवली फक्त एकच अट, पण कोणती? समीकरण बिघडणार

High Court Clerk Typing Test Chaos: कल्याण एपीएमसी परीक्षा केंद्रातील गोंधळामुळे हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्ट कोलमडली; २५०हून अधिक विद्यार्थ्यांचा ठिय्या

SCROLL FOR NEXT