Solapur Municipal Corporation
Solapur Municipal Corporation 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा 'बायोमेट्रिक'ला ठेंगा 

विजयकुमार सोनवणे

सोलापूर : महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार असलेल्या कार्यालयांमध्ये "थंब' करणे सुरू केल्याने "बायोमेट्रिक हजेरी' योजनेची ऐशीतैशी झाली आहे. नियुक्त कार्यालयातील यंत्रावरच "थंब' करण्याचे आदेश असूनही बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. 

महापालिका कर्मचाऱ्यांनी वेळेवर कार्यालयात यावे यासाठी ही यंत्रणा बसविण्यात आली. सुरवातीला नव्याचे नऊ दिवस संपले आणि कर्मचाऱ्यांनी आपण "महापालिकेचे कर्मचाऱ्यां'चे रंग दाखविण्यास सुरवात केली. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती महापालिका आवारात असलेल्या कार्यालयात आहे. मात्र त्या ठिकाणी "थंब' करण्याऐवजी शहराच्या परिसरात असलेल्या किंवा विभागीय कार्यालयात जाऊन "थंब' केले जात आहे. एकदा थंब केले, की कामावर रुजू झाल्याचे निश्‍चित होते. मग तो कर्मचारी त्याच्या नियुक्त असलेल्या कार्यालयात असेलच असे नाही. कार्यालयातील मशिन बंद आहे, सध्या महापालिकेच्याच कामावर आहे, अशी कारणे सांगितली जातात. 

काही वरिष्ठ अधिकारीही इतर ठिकाणी जाऊन "थंब' करीत आहेत. विरोध झाला, की "तुम्ही पगार देता का' असे उलट उत्तरे दिली जात आहेत. प्रभाव संपलेल्या काही राजकारण्यांचे नातेवाईक महापालिकेत नोकरीत आहेत. अजूनही आपल्या "काका, मामा'चीच सत्ता आहे, अशा थाटात ते वावरतात. आम्ही कुठंही थंब करू, आम्हाला कोण अडवतो, अशी त्यांची भूमिका असते. त्यामुळे प्रामाणिक कर्मचारी "आपले काम भले, आपण भले' असे म्हणत दिवस काढत आहेत. कठोर प्रशासक म्हणून वातावरण निर्मिती केलेले अधिकारी मात्र या सर्वांकडे काणाडोळा करीत आहेत. हा प्रकार त्यांना माहिती नाही, असे नाही. फुटकळ व किरकोळ कारणावरून खातेप्रमुखांच्या बैठकीत प्रामाणिक व ज्येष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे वरिष्ठ या प्रकाराकडे का दुर्लक्ष करीत आहेत, अशी विचारणा प्रामाणिक कर्मचारी करीत आहेत. 

.. तर जबाबदार कोण? 
महापालिका आवारातील कार्यालयात नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्याने एखाद्या विभागीय कार्यालयात "थंब' केले, याचा अर्थ तो त्या कार्यालयात आहे, असा होतो. मात्र दुर्दैवाने त्या कर्मचाऱ्याबाबत काही दुर्घटना झाली, तर हा कर्मचारी कार्यालयात असताना दुर्घटना कशी झाली, असा प्रश्‍न उपस्थित होऊ शकतो. अशा घटनांची जबाबदारी कोण घेणार, हा मुद्दा येऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT