ganesh festival
ganesh festival 
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात जल्लोषात मिरवणुका संपन्न

सकाळवृत्तसेवा

सोलापूर : ढोल ताशांचा गजर, गुलालाची उधळण, पुष्पवृष्टी आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष अशा भक्तीमय वातावरणात संपूर्ण सोलापूर नगरी दुमदुमून गेली. विसर्जन मिरवणुकांनी सोलापुरच्या रस्त्यांवर जनसागर उसळला होता. गिरणगावातील परिसर बाप्पांच्या विसर्जन मिरवणूकांच्या जल्लोषाने दणाणून गेला होता. 

सकाळी विसर्जन मिरवणुकीचा पहिला मान असलेल्या बाळीवेस येथिल कसबा गणपतीची मिरवणूक निघाली. त्या पाठोपाठ सोलापूरातील मानाच्या आजोबा गणपतीच्या मिरवणूकीस सुरूवात झाली. त्यानंतर पत्रा तालीमच्या लोकमान्य संयुक्त गणेशोत्सव मंडळ, समर्थ गणेशोत्सव, जोशी समाजाचा लाल आखाड्याच्या वस्ताद गणपती, पाणी वेस तालीम, थोरला मंगळवेढा तालीम, पुर्व भागातील ताता गणपती अशा मोठ्या गणेश मंडळांच्या मुर्तीनी विसर्जनासाठी प्रस्थान केले. गुलालाने माखलेले कार्यकर्ते, ढोल ताशांच्या तालावर बेधुंद होऊन नाचत होते. दुपारी तीन वाजता मानाच्या देशमुख गणपतीची पुजा चौपाड येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सोलापूरच्या प्रथम नागरीक महापौर शोभा बनशेट्टी, पालिका आयुक्त अविनाश ढाकणे आदि मान्यवरांचा हस्ते पार पडली.

बहुतेक मोठ्या मंडळांच्या मिरवणूका ह्या गणपती घाट, विष्णू घाटाच्या दिशेने मार्गस्थ होत होत्या. एकंदरीत मोठ्या मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रात्री उशिरापर्यंत या विसर्जन मिरवणुका सुरूच राहणार असं चित्र पहावयास मिळत होतं. सोलापूर शहर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता. त्याचं बरोबर सीसीटीव्हीच्या माध्यमातून ही पोलिस मिरवणूक मार्गावर लक्ष ठेऊन. विसर्जन मिरवणूकीतल प्रत्येक बारीक सारीक गोष्टींवर पोलिस आयुक्त महादेव तांबडे हे  लक्ष ठेवून होते. मध्य रात्री बारा वाजता प्रत्येक मंडळींनी  आपले वाद्य बंद केले व  मिरवणूका मार्गस्थ करतं गणपती बाप्पाचे विसर्जन केलं. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत मिरवणूका पार पडल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

SCROLL FOR NEXT