70 Foot Road
70 Foot Road 
पश्चिम महाराष्ट्र

बेफिकीर प्रशासनाचा नमुना सत्तर फूट रोड!

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : चिप्पा मार्केटमध्ये व्यवसाय होत नाही, या कारणामुळे भाजी विक्रेत्यांनी सत्तर फूट रोडवर अतिक्रमण करून ठिय्या मांडला. अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई नाही, पोलिस प्रशासन व वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणे हटणे लांबच राहिले, आता तर रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या भाजी विक्रेत्यांचे रंगीबेरंगी तंबू मात्र वाहतुकीसाठी धोक्‍याची लाल निशाणी ठरत आहे. आता सत्तर फूट रोडकडे बेफिकीर प्रशासनाचा उत्तम नमुना म्हणून पाहिले जात आहे.

रहिवाशांना मन:स्ताप

सत्तर फूट रोडवरील भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर सर्व सोयीसुविधांनी युक्त चिप्पा मार्केटमध्ये 28 नोव्हेंबर 2018 रोजी करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनी व्यवसाय होत नाही, या कारणावरून विक्रेत्यांनी पुन्हा सत्तर फूट रोडवर अतिक्रमण केले आहे. सुरवातीला अतिक्रमण विरोध पथकाने कारवाई केल्याने रस्ता मोकळा झाला होता. मात्र परिसरातील गल्लीबोळांमध्ये या विक्रेत्यांनी व्यवसाय थाटल्याने परिसरातील रहिवाशांना मन:स्ताप सहन करावा लागला. एक-दोन आठवडे अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई झाली, सत्तर फूट रोड वाहनधारकांसाठी सुरक्षित झाला; मात्र नंतर असं काय घडलं की, अतिक्रमण विरोधी पथकाने येथील अतिक्रमणावर कारवाई करणे थांबवले, हे गुपित अजून उघड होत नाहीये.

बिनदिक्कत तंबू उभारून व्यवसाय

अतिक्रमण विरोधी पथक फिरकणे बंद झाले, कारवाई थंडावली तसे विक्रेते निर्ढावले. सत्तर फूट रोडपासून माधवनगर रस्त्याच्या कडेला फळ, भाजी व मिरची विक्रेत्यांनी ठिय्या मांडले आहे. त्यामुळे गेंट्याल चौक ते माधवनगर रस्त्याकडे जाणारा रस्ता नेहमी वाहतुकीच्या कोंडीमुळे त्रस्त आहे. तसेच सत्तर फूट चौक ते साईबाबा चौक या दरम्यानच्या रस्त्याच्या दुतर्फा भाजी विक्रेत्यांनी बिनदिक्कत तंबू उभारून व्यवसाय सुरू केला असल्याने वाहनधारकांना आता या वाहतुकीसाठीचा रस्ता सोडून परिसरातील गल्ली-बोळांतून जावे लागत आहे.
पूर्वभागाच्या रहिवासी असलेल्या महापौर श्रीकांचना यन्नम या रस्त्यावरून नेहमी ये-जा करीत असतात. त्यांनीही या रस्त्यावरील अतिक्रमणांचा त्रास सहन केला असेल. आता आपल्या महापौरपदाच्या कार्यकालात त्यांनी या जटिल होत असलेल्या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

नूतन महापौर व प्रशासनाने घ्यावी योग्य भूमिका
संबंधित सर्व प्रशासनांकडून कारवाई होत नसल्याने, आम्हाला कोणी हटवू शकत नाही, अशा निर्ढावलेल्या भावनेने विक्रेत्यांनी सत्तर फूट रोडवर जणू कब्जाच केला आहे. नेमके कोणाच्या आशीर्वादाने हा रहदारीचा रस्ता विक्रेत्यांना बहाल होत आहे, हे कळायला हवे. आताच्या महापौर पूर्व भागाच्या आहेत. त्यांनी व प्रशासनाने आताच योग्य ती भूमिका घेणे आवश्‍यक आहे.
- निरंजन बोद्धूल, अध्यक्ष, शिवबा बहुउद्देशीय संस्था

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

T20 WC 2024 Team India Squad : बीसीसीआय अजूनही संघात करून शकते बदल; जाणून घ्या आयसीसीच्या खास नियमाबद्दल

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT