Solapur youth say on what political statement (video) 
पश्चिम महाराष्ट्र

राजकीय संघर्षावर सोलापूरची तरुणाई काय म्हणतेय पहा (व्हिडीओ)

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : राज्यात महिनाभरापासून सत्ता संघर्षाचा पेच सुटता सुटेनाय. दररोजच गुंता वाढत जात असताना सोलापुरातील तरुणाईने यावर संताप व्यक्त केला आहे. आमच्या मताला काय किंमत आहे की नाही... यासाठीच आम्ही निवडून दिलंय का, असा प्रश्‍न करत आमच्या समस्या सोडवण्याला प्रधान्य देण्याची मागणी तरुणाईने केली आहे. सुरू असलेल्या सत्ता संघर्षाबाबत "सकाळ'ने तरुणाईला बोलतं केलं. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणाईने सडेतोडपणे आपली भूमिका स्पष्ट केली. 

- हेही वाचा : 'आम्ही १६२'

स्थिर सरकार हवं
सध्या महाराष्ट्रात चालेल्या घडमोडी व पडलेल्या ओल्या दुष्काळामुळे सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. मतदारांनी भाजप व शिवसेनेला कौल दिला. त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. महाराष्ट्रातील सद्यस्थितीत जनतेला आणि शेतकऱ्यांना त्यांच्या पाठीशी उभारणारे स्थिर सरकार पाहिजे. 
-प्रा. सुनील कामतकर 
 
सध्या सर्वच अनैसर्गिक युती
शिवसेना, राष्ट्रवादी, कॉंग्रेस किंवा भाजप, राष्ट्रवादी यांची आघाडी व युती अनैसर्गिक आहे. भाजप- शिवसेना यांची नैसर्गिक युती आहे. त्या दोघांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावे. सध्या प्रत्येक पक्षाने आपले विचार पायदळी तुडवले आहेत. सध्याचे सरकार टिकले तर ते एकमेकांच्या चुका झाकण्यातच पाच वर्षे जातील. 
- प्रशांत मांजरे 

हेही वाचा : राजं, बघताय नव्हं काय चाललंय ते
सरकार टिकणार नाही

भाजपने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करणे चुकीचे आहे. हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. भाजप-शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले पाहिजे. भारत हा युवकांचा देश आहे. पण आयोग एमपीअएसी आणि यूपीएससीच्या जागा खूपच कमी प्रमाणात काढत आहेत. 
- नवनाथ चोतवे 

शेतकर्यांच्या प्रश्नाचे काय?
भाजप-शिवसेना हे हिंदुत्ववादी विचारसरणीचे पक्ष आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस हा धर्मनिरपेक्ष विचारसारणीचे पक्ष आहेत. जनतेने भाजप आणि शिवसेनेला कौल दिला आहे. त्यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी. सध्या शेतकरी ओल्या दुष्काळामुळे पुरता खचला आहे. मात्र, कोणत्याच राजकीय नेत्यांचे त्याकडे लक्ष नाही. 
- बसवराज अरवत 

हेही वाचा : अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क

विचारसरणीची पायदळी
भाजपने आपल्या विचारसरणीला तिलांजली देत त्यांचे लक्ष आता फक्त सत्ता मिळवणे एवढेच आहे. केंद्रातील भाजपने आणि अन्य राज्यातील भाजप सरकारने जनतेला आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सगळ्याच पक्षांनी आपली विचारसरणी पायदळी तुडवत आहे. 
- मल्लेश भिमणवरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election: ५ मुख्यमंत्री, ४ सिनेस्टार अन्...; बिहार निवडणुकीसाठी भाजपच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील किती नेते?

Kapil Sharma Cafe Firing VIDEO : कॅनडात कपिल शर्माच्या ‘Kaps Caffe’वर तिसऱ्यांदा गोळीबार ; लॉरेन्स गँगने घेतली जबाबदारी!

Gevrai News : गेवराईचे माजी आमदार मशाल सोडून घेणार कमळ हाती, ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेना(युबीटी)ला मोठा हादरा

Dmart Sale : डीमार्टमध्ये सुरुय प्री-दिवाळी वीकेंड सेल; 50% ते 80% डिस्काउंट, एकदम स्वस्तात मिळतायत वस्तु, सर्व ऑफर्स पाहा एका क्लिकवर

Diwali Bonus: दिवाळीआधीच महापालिका कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा! महाराष्ट्र सरकारकडून बोनस जाहीर, पण किती?

SCROLL FOR NEXT