solapur traffic signal
solapur traffic signal Sakal
सोलापूर

Solapur News:तांत्रिक बिघाडामुळे १२ सिग्नल बंद !

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी, अपघात कमी व्हावेत, गुन्हेगारीवर आळा बसावा या हेतूने शहरातील सिग्नल सुरु करण्यात आले होते. १२ लाखांवर लोकसंख्या आणि सात लाखांहून अधिक वाहने असलेल्या स्मार्ट सिटीत अवघे १९ सिग्नल असून त्यातील पण १२ सिग्नल तांत्रिक बिघाडामुळे बंदच आहेत.

जड वाहतुकीमुळे दोन चिमुकल्याचा जीव गेल्यानंतर महापालिकेने वाहतूक पोलिसांच्या पत्राची दखल घेत तातडीने सात-आठ सिग्नल दुरुस्त करून दिले. त्यानंतर १९ पैकी १३ सिग्नल सुरु झाले. त्यामध्ये रंगभवन, लष्कर, सरस्वती चौक, महावीर चौक, आसरा, डफरीन चौक, पत्रकार भवन, शांती चौक, जुना बोरामणी नाका अशा ठिकाणांचा समावेश होता.

मात्र, काही दिवसांतच बहुतेक सिग्नल उन्हामुळे तर काही सिग्नल तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडले. १५ ते २० वर्षांपूर्वीच्या सिग्नल यंत्रणेत अनेक अत्याधुनिक बदल झाले, पण महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जुन्याच सिग्नलवर शहराच्या वाहतुकीची भिस्त अवलंबून राहिली.

रस्ते अपघतात सोलापूर शहर व जिल्हा राज्याच्या टॉपटेन जिल्ह्यांमध्ये आहे. दरवर्षी सरासरी सहाशेहून अधिक जणांचा रस्ते अपघातात जीव जातोय. मात्र, ठोस उपाययोजनांकडे कोणत्याच यंत्रणेने गांभीर्याने पाहिले नाही, अशी चर्चा आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील कमकुवत सिग्नल यंत्रणा आहे.

रस्त्यांच्या कामामुळे तुटले वायरिंग

स्मार्ट सिटी किंवा महापालिकेच्या माध्यमातून अनेकदा रस्ते, ड्रेनेजसाठी आणि खासगी मोबाइल कंपन्यांसाठी खोदकाम केले जाते. त्यावेळी अनेक सिग्नलचे वायरिंग तुटल्याची स्थिती आहे. दुसरीकडे जुनाट सिग्नलमधील वेळदेखील वाहनधारकांसाठी त्रासदायक असून त्यात बदल करता येत नाही. उन्हाचा तडाखा वाढला की काही सिग्नल आपोआप बंद पडतात, अशीही वस्तुस्थिती आहे. त्यासंदर्भात सिग्नलची कायमचीच दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे केली. मात्र, त्यावर अजूनही ठोस कार्यवाही होऊ शकलेली नाही.

सोलापूर शहरात वाहनांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याने वाहतूक नियंत्रित राहावी, अपघात होऊ नयेत म्हणून वास्तविक पाहता बऱ्याच ठिकाणी सिग्नल वाढ अपेक्षित आहे. पण, सध्या शहरात एकूण १९ ठिकाणी सिग्नल आहेत. त्यातील सात सिग्नल सध्या सुरु असून उर्वरित सिग्नल तांत्रिक बिघाडीमुळे बंद पडले आहेत. त्यासंदर्भात महापालिका प्रशासनाला पत्र देऊन दुरुस्तीची मागणी केली आहे.

- अजय परमार, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा, सोलापूर शहर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: यश दयालने गुजरातला दिला दुहेरी दणका! राशिद खानपाठोपाठ तेवतियाही बाद

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT