wine 
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यात आज सुरू झाली मद्य विक्रीची 157 दुकाने 

प्रमोद बोडके

सोलापूर : शेजारच्या जिल्ह्यात सुरू झाली, आपल्याकडे कधी होणार? सोलापूर शहरात नाही किमान ग्रामीण भागात तरी सुरू करा यासह अनेक चर्चा आणि अपेक्षांना आज पूर्णविराम मिळाला. सोलापूर शहर व जिल्ह्यातील मद्य विक्रीची तब्बल 157 दुकाने आजपासून सुरू झाली आहेत. 22 मार्चपासून बंद झालेली किरकोळ मद्यविक्री दुकाने आज तब्बल 82 दिवसानंतर सुरू झाली आहेत. 

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्री सुरू करण्यास आजपासून परवानगी दिली. याबाबतच्या बातम्या, सोशल मीडियावरील पोस्ट मागील दोन दिवसांपासून प्रचंड प्रसारित होत होत्या. तब्बल 82 दिवसांपासून बंद असलेली दुकाने आजपासून सुरू होणार असल्याने सकाळी 10 वाजल्यापासूनच मद्य खरेदीकरिता ग्राहकांची दुकानाभोवती गर्दी होत होती. सोशल डिस्टन्ससाठी केलेल्या रकान्यात कोणी उभा रहात होते तर कोणी दुकानाशेजारी असलेल्या अन्य दुकानांजवळ उभा राहून दुकान कधी उघडते? याची वाट पहात होते. 

मद्यविक्री घरपोच करण्याचा नियम घालून दिल्याने दुपारी एकच्या दरम्यान सोलापुरातील वाइन शॉप उघडण्यास सुरवात झाली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर शिल्लक मद्य साठ्याची नोंद घेतल्यानंतर किरकोळ मद्य विक्रीला प्रारंभ झाला. घरपोच मद्य सेवेसाठी असलेला संपर्क क्रमांक दुकानदारांच्या वतीने दर्शनी भागात लावण्यात आला आहे. घरपोच मद्य सेवेचा संपर्क क्रमांक टिपण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू होती.

आसरा चौकातील राजकमल वाइन्ससमोर काहीकाळ ग्राहकांची गर्दी झाली होती. सोलापूर शहर व जिल्ह्यातील घाऊक मद्यविक्री सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी यापूर्वीच परवानगी दिलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घाऊक मद्य विदेशी मद्य विक्रीचे पाच ट्रेडर्स, घाऊक देशी मद्य विक्रीचे 12, विदेशी मद्य निर्मितीचे दोन प्रकल्प आणि दोन वायनरी यापूर्वीच सुरू करण्यात आलेले आहेत. 

आजपासून सुरू झालेली सोलापूर शहर व जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 
देशी दारू दुकान : 42 
वाइन शॉप : 32 
बिअर शॉप : 19 
परमिट रूम : 64 
एकूण : 157 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू; २० प्रभागांसाठी ५८४ मतदान केंद्रांची अधिकृत घोषणा

नवऱ्याला ८० हजार पगार, तरीही हुंड्यात मागतोय म्हैस; पत्नी तीन वर्षांपासून माहेरी, पोलिसांत जात नवऱ्याचे काळे कारनामे केले उघड

Viral Video : शिक्षक की हैवान? दिव्यांग मुलाला पाइपने बेदम मारहाण, डोळ्यात फेकली मिरची पावडर; व्हिडिओ पाहून रक्त खवळल्याशिवाय राहणार नाही

Shubman Gill: शुभमन गिलची संघात झाली निवड; अर्शदीप सिंग, अभिषेक शर्मा यांच्यासोबत खेळताना दिसणार; न्यूझीलंडविरुद्ध...

Heart Attack Risks: तुमच्या आरोग्याशी संबंधित 'हे' ४ घटक ठरतायत हृदयाचे शत्रू; ९९% भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका! आजच तपासा

SCROLL FOR NEXT