16 patients were found in Akkalkot taluka on Tuesday 
सोलापूर

अक्कलकोट तालुक्‍यात कोरोनाचा कहर; मंगळवारी आढळले तब्बल 16 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा

अक्कलकोट (सोलापूर) : अक्कलकोट तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा कहर सुरूच असून मंगळवारी तालुक्‍यात तब्बल 16 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे. 
अक्कलकोट तालुक्‍यात या आठवड्यात दररोज उच्चांकी संख्येने कोरोनाबधित रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत असून वातावरण देखील भीतीदायक बनत आहे. आज आढळलेल्या कोरोनाबधित रुग्णांत अक्कलकोट शहरातील जंगी प्लॉट (05), 
फत्तेसिंह चौक (07), नागनहळ्ळी (01), बुधवार पेठ (01), चपळगाव (01), देशमुख बोरगाव (01) येथील रूग्णांचा समावेश आहे. अक्कलकोट तालुक्‍यात मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत एकूण रूग्ण संख्या 118 एवढी झाली आहे. अक्कलकोट येथे सोमवारपासून जनता कर्फ्यू सुरू आहे. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, बसलिंगप्पा खेडगी, अशपाक बळोरगी यांनी व्यापारी वर्गाची समजूत काढून जनता कर्फ्य चालू केली. या मागचा उद्देश असा आहे, की शहरातील नागरिकांचा जो सर्व्हे सुरू आहे. त्यावेळी सर्व नागरिक घरी असावेत जेणेकरून कोरोनावर नियंत्रण लवकर आणणे शक्‍य होईल. पण अद्यापही काही नागरिक शहरात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे सर्व्हेत व्यत्यय येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT