road
road 
सोलापूर

आंतरजिल्हा, आंतरराज्य रस्ते मे अखेर बंदच !

तात्या लांडगे

कडक संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर काढलेले आदेश 1 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

सोलापूर : जिल्ह्यातील आंतरजिल्हा व आंतरराज्य सरहद्दीवरील 173 लहान-मोठे रस्ते (173 major and minor roads) वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. लोकांच्या येण्या- जाण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही अत्यावश्‍यक सेवांसाठी ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी 26 रस्ते (Roads) सुरू ठेवले जाणार आहेत. कडक संचारबंदीच्या (Sancharbandi) पार्श्‍वभूमीवर काढलेले आदेश 1 जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कायम ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी दिली. (173 major and minor roads on inter district and inter state border in solapur district have been closed for traffic)

जिल्ह्यातील पांगरी, बार्शी तालुका, अकलूज, करमाळा, सोलापूर तालुका, मंद्रूप, मंगळवेढा, सांगोला, अक्‍कलकोट उत्तर व दक्षिण आणि वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत 26 रस्ते सुरू ठेवले जाणार आहेत. वळसंग पोलिस ठाण्याअंतर्गत ढेंबरेवाडी- येडशी, शिराळा- येरमाळा, पिंपळवाडी- येरमाळा, पांगरी- ढेंबरेवाडी- येडशी, नारी- इंदापूर- उस्मानाबाद, बार्शी तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत बार्शी- परांडा- भूम, अकलूज पोलिस ठाण्याअंतर्गत अकलूज- टेंभूर्णी, करमाळा पोलिस ठाणेअंतर्गत डिकसळ- भिगवण, कोर्टी- सावडी- राशीन, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत बार्शी ते सोलापूर रोडने वैरागमार्गे, तुळजापूर ते सोलापूर मुख्य हायवेरून, हैदराबाद रोडने तांदुळवाडीमार्गे मुख्य हायवेवरून, मंद्रूपअंतर्गत आरळी बंधारा, टाकळी (विजयपूर-रोड), मंगळवेढा पोलिस ठाण्याअंतर्गत सोंडीफाटा व उमदी जत, चडचण- हुलजंती- कात्राळ, नंदूर- कात्राळ- रेवतगाव, सांगोल्यातील शेरेवाडी- कटफळ- सांगोला, जुनोनी- सांगोला, लक्ष्मीनगर- सोनंद- सांगोला, अक्‍कलकोट तालुक्‍यातील अक्‍कलकोट ते सोलापूर, अक्‍कलकोट ते वागदरी, अक्‍कलकोट ते हन्नूर, दुधनी ते अफजलपूर, तडवळ ते सोलापूर आणि क्रांती चौक ते मेन रोड (वळसंग पोलिस ठाणे) हे रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहणार आहेत.

(173 major and minor roads on inter district and inter state border in solapur district have been closed for traffic)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मध्यरात्री ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात! 4 जणांचा मृत्यू तर 15 जण जखमी, धक्कादायक व्हिडिओ समोर

मतदारांच्या फायद्याची बातमी! पत्ता बदलण्यासाठी ‘अर्ज क्र.8’ तर यादीत नाव समाविष्टसाठी भरावा लागतो अर्ज क्र. 6; ‘या’ संकेतस्थळावर आजच भरा अर्ज

Salman Khan house firing case: सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या मृत्यूचा कोर्टाने मागवला अहवाल; पोलीस कोठडीत संपवलं होतं जीवन

Latest Marathi News Live Update : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची धडाडणार तोफ; इंडिया आघाडीचे नेते राहणार उपस्थित

National Dengue Day 2024 : डेंग्यूचे डास जवळपास फिरकणार ही नाहीत, फक्त तुमच्या दिनचर्येत करा 'हे' बदल

SCROLL FOR NEXT