Fire
Fire Sakal
सोलापूर

Tembhurni Fire : टेंभुर्णीमध्ये आगीत अडीच कोटींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

शेती उद्योग भांडार व शेती बीज भांडार या नावाच्या शेती उपयोगी खते, बी-बियाणे, औषधे, स्प्रे पंप विक्रीच्या दुकानांस विजेचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली.

टेंभुर्णी - टेंभुर्णी शहरातील जुन्या सोलापूर- पुणे महामार्गावरील शेती उद्योग भांडार व शेती बीज भांडार या नावाच्या शेती उपयोगी खते, बी-बियाणे, औषधे, स्प्रे पंप विक्रीच्या दुकानांस विजेचा शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. ही घटना रविवारी (ता. १४) रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना, कुर्डुवाडी नगरपालिका व इंदापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलांनी सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाने तातडीने आग विझविण्यास सुरवात केल्याने येथील व्यापारी दिलीपचंद धोका यांचे घर व कोहिनूर हाउस ऑफ शॉपी हे कापड दुकान आगीपासून वाचविण्यात यश मिळविले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही; मात्र दोन्ही दुकानांतील अडीच कोटी किमतीचे साहित्य जळून खाक होऊन मोठी आर्थिक हानी झाली.

टेंभुर्णीतील व्यापारी स्वप्नील दिलीपचंद धोका (वय ३८) यांचे जुन्या पुणे- सोलापूर महामार्गावर शेती उद्योग भांडार नावाचे दुकान व गोदाम आहे. या दुकानाशेजारी वडील दिलीपचंद भागचंद धोका यांचे शेती बीज भांडार नावाचे दुकान आहे. या दुकानालगत कोहिनूर हाउस ऑफ शॉपी नावाचे त्यांचे कापड दुकान आहे. या दोन्ही दुकानांच्या वरील मजल्यावर धोका कुटुंबीय राहतात.

रविवारी सायंकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे दुकान बंद करून धोका हे वरील मजल्यावरील घरी गेले. रात्री साडे अकराच्या सुमारास दुकानासमोरील व्यावसायिक दीपक डोईफोडे यांनी मोबाईलवरून दुकानासमोरील विजेच्या तारांमधून ठिणग्या पडत आहेत, खाली येऊन पाहा असा फोन केला. त्यामुळे स्वप्नील धोका यांनी तातडीने खाली दुकानाचे शटर उघडून पाहिले तेव्हा दुकानात आग लागल्याचे दिसले. आग विझविण्यासाठी बाळासाहेब भोज यांना त्यांचा पाण्याचा टँकर घेऊन बोलावले व आग विझविण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दुकानातील औषधांमुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, कुर्डुवाडी नगरपालिका व इंदापूर नगरपालिकेतील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. आमदार संजय शिंदे, धनश्री उद्योग समूहाचे प्रमुख रमेशराव शिंदे, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी अग्निशमन दलास आग विझविण्याची सूचना करून सहकार्य केले. रात्री बारापासून आग विझविण्यास सुरवात झाली. सकाळी सहा वाजता आग आटोक्यात आली. अग्निशमन दलाने कोहिनूर हाऊस ऑफ शॉपी व दिलीपचंद धोका यांचे घर आगीपासून वाचविले.

या आगीत शेती उद्योग भांडार या दुकानातील शेती उपयोगी खते, बी- बियाणे, औषधे, स्प्रे पंप, दुकानातील फर्निचर, कॉम्प्युटर, अकाउंट केबिन, बिले, कोहिनूर हाउस ऑफ शॉपी दुकानाची बिले, दुकानातील संपूर्ण माल व इतर साहित्य असा एकूण अंदाजे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले. तसेच दिलीपचंद धोका यांच्या दुकानातील अंदाजे ५० लाख रुपये किमतीची खते, बी- बियाणे, औषधे, स्प्रे पंप संपूर्ण माल व इतर साहित्य जळून खाक झाले. याप्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात स्वप्नील धोका यांनी खबर दिली असून, पोलिस उपनिरीक्षक धनाजी ओमासे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT