1Corona_93.jpg 
सोलापूर

शहरात आढळले नवे 27 रुग्ण ! 39 रुग्ण बरे होऊन परतले घरी

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या कमी- अधिक होऊ लागली असून मृत्यूची संख्या कमी झाल्याचे समाधान आहे. शहरात आज 645 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. शहरातील 23 ठिकाणी नवे रुग्ण आढळले असून आता शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या 281 झाली आहे.

ठळक बाबी... 

  • शहरातील एक लाख 30 हजार 571 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत शहरात आढळले दहा हजार 709 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह
  • आज 645 संशयितांमध्ये 27 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह; 39 रुग्ण बरे झाले
  • आतापर्यंत शहरातील नऊ हजार 852 रुग्णांनी केली कोरोनावर मात
  • शहरात आता उरले 281 रुग्ण; आज एकाही रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू नाही

शहरात आज उत्कर्ष नगर, जानकी नगर (विजयपूर रोड), रेल्वे लाईन्स, आशिर्वाद नगर (मजरेवाडी), आसरा सोसायटी, चिदंबर नगर, विरशैव नगर (जुळे सोलापूर), होटगी रोड, मानस अपार्टमेंट, 70 फूट रोड (न्यू पाच्छा पेठ), होटगी नाका, शेळगी, लष्कर, राजेश्‍वर नगर, यशराज नगर, सोमवार पेठ, जोडभावी पेठ, कर्णिक नगर, अंबिका नगर (कुमठा नाका), काडादी नगर (होटगी रोड), विकास नगर, बुधवार पेठ आणि मजरेवाडी येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 127 संशयित होम क्‍वारंटाईन असून 25 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. तर नऊजण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दरम्यान, 'लवकर शोध, लवकर निदान' यानुसार संशयितांनी लवकर तपासणी करावी, घाबरु नये, सावध राहून कोरोनाला दूर ठेवा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'निवारा ट्रस्ट'च्या नावाखाली गोरगरिबांना 22 लाखांचा गंडा; पूजा भोसलेला 3 वर्षांनी अटक, कोल्हापुरात वेगवेगळ्या हॉलमध्ये लोकांना बोलवत होती!

अरशद वारसीला 'मुन्ना भाई'तील 'सर्किट' रोल करण्याची इच्छाच नव्हती, वाटलेलं करिअर बरबाद होईल

National Drink : भारताचे राष्ट्रीय पेय (ड्रिंक) काय आहे? चहा नाही बरं का...99 टक्के लोकांना माहित नाही उत्तर

दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच धडक, घिरट्या घालत अचानक जमिनीवर कोसळले; घटनेचा धक्कादायक VIDEO समोर

Aadhaar Updates : UIDAI च्या नवीन सूचना! आधार कार्ड स्कॅमपासून वाचण्यासाठी करा ही 5 कामे

SCROLL FOR NEXT