marathi sahitya.jpg 
सोलापूर

सोलापूर शहरात मराठी भवन उभारणीसाठी तीन कोटीचा निधी मंजूर 

शाम जोशी

द. सोलापूर(सोलापूर): सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या दक्षिण सोलापूर शाखेतर्फे केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारकडून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी झाला आहे. 

सोलापूरात मराठी साहित्य, नाट्य, संगीत आणि विविध कला समृध्दीसाठी अनेकांचे योगदान आहे. या शहराने अनेक प्रतिभावंत साहित्यिक, कलावंत महाराष्ट्राला दिले. सीमावर्ती असूनही मराठी भाषेची वृध्दी करण्यात सोलापूर अग्रेसर आहे. 

या सर्व पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये "मराठी भवन' तसेच त्यातील एका विभागाला स्व. दत्ता हलसगीकर यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने केली होती. त्यानुसार स्व. वासुदेव रायते, हास्यसम्राट प्रा. दिपक देशपांडे, प्रशांत बडवे, गुरू वठारे, रवी हलसगीकर यांनी आमदार प्रणिती शिंदेसह तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून मराठी भवनच्या मागणीचे निवेदन दिले होते. गेल्या 7 ते 8 वर्षापासून झालेल्या पाठपुराव्यामुळे सोलापूरात मराठी भवन तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. त्यानिमित्त साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, सल्लागार अविनाश महागांवकर, हास्यसम्राट दिपक देशपांडे, सहकार्यवाह गुरू वठारे, प्रसिध्दी प्रमुख विनायक होटकर, अभय जोशी यांनी आमदार शिंदेचा पुष्पगुच्छ देवून आभार व्यक्त करीत सत्कार केला. 

संपादनः प्रकाश सनपूरकर  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: गांगुलीने निवडली टीम इंडियाची Playing XI; रोहित-कोहलीसह ‘या’ खेळाडूंना संधी, पण एका स्टारला थेट केलं OUT

Latest Marathi News Live Update : धानावरील करपा, खोडकिडीच्या संकटावर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

Kothrud Road,:कोथरूडमधील वृक्षतोडीला स्थगिती; पुनर्रोपणासाठी जागा उपलब्ध नाही

Manmad-Indore Railway;मनमाड-इंदूर रेल्वेसाठी ४,९३० कोटींची निविदा; महू-ग्यासपूरखेडी ७२.६६ किलोमीटर मार्ग; ४८ महिन्यांची कामासाठी मुदत

CJP Mumbai Protest: मुंबईत 'सीजेपी'चा एल्गार! मंत्रालयाबाहेर 'जेन नेक्स्ट' एकवटले; अभिजित दीपकेंचं मोठं विधान, म्हणाले...

SCROLL FOR NEXT