39 nominations have been filed for Waluj Gram Panchayat 
सोलापूर

Gram Panchayat Election : वाळूजकडे लक्ष ! राष्ट्रवादीच्याच दोन गटांत रंगणार सामना? उद्या होणार चित्र स्पष्ट

रमेश दास

वाळूज (सोलापूर) : वाळूज ग्रामपंचायतीसाठी 39, देगाव (वा.) साठी 37, तर मनगोळी-भैरववाडी ग्रुप ग्रामपंचायतींसाठी 11 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरले आहेत. तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दोन गटात दुरंगी सामना होण्याची चिन्हे आहेत. लढतीचे चित्र अर्ज माघारी घेण्यासाठी निवडणूक आयोगाने निश्‍चित केलेल्या चार तारखेनंतर स्पष्ट होणार आहे.
 
सोलापूरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

मोहोळ तालुक्‍यातील 76 ग्रामपंचायतींच्या 736 सदस्यपदांसाठी दाखल झालेल्या 2,966 अर्जांची गुरुवारी (ता. 30) छाननी झाली. यात 17 अर्ज बाद झाले, तर 2,949 अर्ज वैध ठरले आहेत. तालुक्‍यात 104 गावे असून, 94 ग्रामपंचायती आहेत. यापैकी 76 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज छाननीत 17 अर्ज विविध कारणास्तव बाद झाले आहेत. 

त्यात ढोकबाभुळगाव येथील 1, सौंदणे 1, मसलेचौधरी 1, यल्लमवाडी 1, जामगाव (बु.)2, खंडाळी 2, पापरी 1, पेनूर 2, मिरी 2, वडाचीवाडी 1, मुंडेवाडी 1 अर्जाचा समावेश आहे. शिक्षणाची अट, वयाचा दाखला, आर्थिक कामाची प्रकरण दाखले, अपत्य, ठेकेदारी यासह विविध कारणास्तव हे अर्ज बाद झाले आहेत. 

एकूण गावनिहाय दाखल झालेले अर्ज

शिंगोली तरटगाव-25, कामती खुर्द-39, हराळवाडी-28, ढोकबाभुळगाव-27, शिरापूर मो-7, दादपूर-17, जामगाव बु-28, नांदगाव-9, रामहिंगणी-19, विरवडे बु-41, परमेशवर पिंपरी-20, उमेदवारी कोरवली- 37, पिरटाकळी-10, तांबोळे-21, कुरुल-66, नजिक पिंपरी-38, सय्यद वरवडे-44, कातेवाडी-26, शेजबाभुळगाव-36, आढेगाव -13, सौंदणे-33, टाकळी सिकंदर-60, वरकुटे-26, बोपले-17, मनगोळी-भैरववडी- 11, यल्लमवाडी-18, मसले चौधरी-29, नरखेड-44, एकुरके-20, कुरुल 29. देगाव वा-37, वाळूज-39, खंडाळी-62, पापरी-46, पेनूर-75, खवणी-15. पाटकूल-44, खंडोबाची वाडी-9, बिटले-9, गलंदवाडी-पासलेवाडी-9, घाटणे-23, कोळेगाव-38. वाघोली-11, अंकोली-29, औंढी-40, आष्टी -49, देवडी-51, येवती-47, तेलंगवाडी-16, चिखली-18, येणकी-22, वटवटे-8, मिरी- 23, कोथाळे-19, इंचगाव-29, घोडेश्वर- 55, आष्टी शेटफळ-54, सिद्धेवाडी-9, वडाचीवाडी-28, हिवरे-24, भांबेवाडी-10, आष्टे-24, लांबोटी-25, चिंचोली काटी-43, विरवडे खु.15, सावळेश्वर-51, हिंगणी (नि)-22, भोयरे-39, शिरापूर सो-23, अर्जुनसोंड-31, मुंढेवाडी-17, पोफळी-20.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND, 2nd Test: भारताला विजयाची संधी, पण पाऊस थांबणार कधी? शेवटच्या दिवशी खेळ झाला नाही तर काय, जाणून घ्या

'पुन्हा तोच बसस्टॉप' तेजश्री दिसणार जुन्या स्टॉपवर, फोटो शेअर करत म्हणाली, 'तेच ठाणे, तेच ठिकाण आणि तेच तुम्ही..'

Manmad News : मनमाड बाजार समितीच्या अडचणींवर मुख्यमंत्री फडणवीसांचा ‘सर्जिकल स्ट्राइक

Crime: मुंबईत धक्कादायक प्रकार! आधी गळा दाबून मारलं, नंतर ग्रॅनाइट मशीनने पत्नीचा शिरच्छेद अन्...; विक्षिप्त पतीचं कृत्य

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

SCROLL FOR NEXT