corona 
सोलापूर

करमाळ्यात चार इमारतींत 400 बेड केले सज्ज 

अण्णा काळे

करमाळा (जि. सोलापूर) : सोलापूर जिल्हा व ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत करमाळा येथील चार इमारती ताब्यात घेण्यात आल्या असून या चार इमारतींत 400 बेड तयार केले आहेत. कोरोना ग्रामीण भागात पोचला असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तहसीलदार समीर माने यांनी केले आहे. 
तहसीलदार समीर माने यांनी सांगितले, की कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तालुका प्रशासनातर्फे उपजिल्हा रुग्णालय येथे 50 पीपीई किट व तीन ट्रॅडिशनल सेन्सर पुरवण्यात आले आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालयाची नादुरुस्त ऍम्ब्युलन्स दुरुस्त केली आहे. याशिवाय हाजी हशमुद्दीन ट्रस्टच्या वतीने एक ऍम्ब्युलन्स देण्यात आली आहे. तसेच तालुक्‍यातील जेऊर, केम, कोर्टी, साडे व वरकुटे प्राथमिक आरोग्य केंद्रांत 20 पीपीई किटचा पुरवठा केला जाणार आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास पुढील उपचारासाठी प्रशासनाच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. डिटेक्‍टेड कोविड हेल्थ सेंटर व कोविड हेल्थ सेंटरसाठी करमाळ्यातील चार इमारती ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या चार इमारतींमध्ये 400 बेड तयार केले आहेत. क्वारंटाइन केलेल्या लोकांची काळजी प्रशासन घेत आहे. लोकांनी गर्दी टाळावी, भविष्याचा विचार करता घरातच थांबणे आवश्‍यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic News : पुणेकरांनो सावधान! वाहतूक पोलिसांचा बडगा; ३ वर्षांत ४२ लाख वाहनचालकांवर कारवाईचा 'रेकॉर्ड'

Rajgad Illegal Hunting : राजगड तालुक्यात चौशिंग्या हरिण शिकार प्रकरणी वनविभागाकडून चार जणांना अटक; आरोपींकडून हत्यारे व मांस जप्त!

Latest Marathi News Live Update: दुर्मिळ चौशिंग्या हरिण शिकारप्रकरणी चार जणांना अटक

Pune News : ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांची बिनविरोध निवड; राज्य वकील परिषदेचे नेतृत्व पुन्हा पुण्याच्या हाती

Pune Election: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न; 'हे' तीन पक्ष एकत्रित निवडणूक लढवणार

SCROLL FOR NEXT