Ujani Dam sakal
सोलापूर

Ujani Dam : उजनी धरणात ५० टीएमसी पाणीसाठा;प्लसमध्ये येण्यासाठी २५ पावले दूर,धरणात ६८०० क्युसेकची आवक

उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर पहिल्यांदाच पोचलेल्या जिल्ह्याच्या वरदायिनीत सध्या ५० टीएमसी पाणी आहे. ७ जून ते १७ जुलै या काळात उजनीत पावसाचे १९ टीएमसी पाणी जमा झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : उन्हाळ्यात उणे ६० टक्क्यांवर पहिल्यांदाच पोचलेल्या जिल्ह्याच्या वरदायिनीत सध्या ५० टीएमसी पाणी आहे. ७ जून ते १७ जुलै या काळात उजनीत पावसाचे १९ टीएमसी पाणी जमा झाले आहे. आता उजनी प्लसमध्ये येण्यासाठी आणखी २५ पावले पार करावी लागणार आहेत. सोलापूर शहर-जिल्ह्यासह धाराशिव, नगर (कर्जत-जामखेड), इंदापूर, बारामती या शहरांसह सोलापूर, पुणे जिल्ह्यातील बहुतेक उद्योगांना उजनीचाच आधार आहे.

जिल्ह्यात साखर करखानदारी वाढण्यात आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात उजनीचा मोठा वाटा राहिला आहे. उजनी धरणातील ११७ टीएमसी पाणी मावते, पण त्यातील ८४ टीएमसीच पाणी दरवर्षी वापरण्याचे नियोजन ठरले आहे. यंदा उजनी धरण उणे ६० टक्क्यांपर्यंत पोचल्याने सोलापूर महापालिकेला धरणावर दुबार, तिबार पंपिंग करावे लागले होते. आता धरण उणे २५ टक्क्यांवर (उणे १२ टीएमसी) आले आहे. ७ जूनपासून पुणे जिल्ह्यातील व धरण परिसरातील पावसामुळे धरणात १९ टीएमसी पाणी आले आहे.

धरणात अजून ६७ टक्के पाणी अपेक्षित आहे. पावसाळा सुरू होऊन एक महिना पूर्ण झाला आहे, पण पुणे जिल्ह्यातील धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात विशेषत: धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस झालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्याच्या वरदायिनीला प्लसमध्ये येऊन पूर्ण भरायला वाट पाहावी लागणार असल्याची स्थिती आहे. गतवर्षी जुलैअखेर धरण प्लसमध्ये होते.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

एकूण साठवण क्षमता

११७ टीएमसी

सध्याचा पाणीसाठा

५० टीएमसी

पाण्याची टक्केवारी

उणे २६ टक्के

धरणातील पाण्याची आवक

६,८०० क्युसेक

शेतीला मिळेल एक आवर्तन जास्त

सोलापूर शहरासाठी दरवर्षी भीमा नदीतून पिण्यासाठी पाणी सोडले जायचे. पण, आता शहरासाठी सोलापूर ते उजनी समांतर जलवाहिनी टाकली जात असून, त्याचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील उन्हाळ्यात सोलापूरसाठी नदीतून दोन-तीन आवर्तने सोडावी लागणार नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आवर्तन जास्तीचे मिळू शकते, अशी आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT