सोलापूर : येथील मध्यवर्ती कारागृहाची क्षमता अवघी २०० कैदी बसतील एवढीच आहे. तरीदेखील जागेअभावी त्या ठिकाणी तब्बल ५०० कैदी ठेवण्यात आले आहेत. जुन्या तुरुंगालगत नवीन इमारतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. परंतु, मागील तीन-साडेतीन वर्षांपासून काम अर्ध्यावरच थांबले आहे.
सोलापूर शहर-ग्रामीणमधील विविध गुन्ह्यांतील आरोपी सध्या शहरातील मध्यवर्ती कारागृहात कैद आहेत. त्यात अत्याचार, खून, हाणामारी, विनयभंग अशा प्रकरणातील कैद्यांची संख्या अधिक आहे. सोलापूर जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याने शहरातील मध्यवर्ती कारागृह तुडूंब भरल्याचे चित्र आहे. कैद्यांच्या दाटीमुळेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तुरुंगातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह अनेक कैद्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कैद्यांची सोय दुसरीकडे करण्यात आली होती. कोरोना काळात कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काही कैद्यांना तात्पुरते सोडून दिले होते. आता तेही पुन्हा तुरुंगात परतले आहेत. मध्यवर्ती कारागृहातील पाच बराकीत कैद्यांची संख्या प्रचंड झाल्याची स्थिती आहे. राज्यातील बहुतेक तुरुंगामधील स्थिती तशीच आहे. त्यामुळे ज्यादा झालेले कैदी इतरत्र हलविताही येत नाहीत. सोलापुरातील मध्यवर्ती कारागृहातील जुन्या इमारतीची क्षमता २०० कैद्यांची आहे. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्या इमारतीजवळ दुसरी इमारत बांधली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ते काम केले जात आहे. मात्र, एक कोटी २८ लाख रुपयांचा निधी अजून लागणार आहे. त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाला पाठवूनही अजूनपर्यंत निधी मिळू शकलेला नाही. त्यामुळे निधी मिळून काम पूर्ण होईपर्यंत तुरुंगातील कैद्यांना दाटीवाटीतच राहावे लागणार आहे.
मध्यवर्ती कारागृहाची स्थिती
कैद्यांची क्षमता
२००
सध्याचे कैदी
५००
नवीन इमारतीची क्षमता
२४०
इमारतीच्या उर्वरित कामांसाठी निधी
१.२८ कोटी
नवीन इमारतीची प्रतीक्षा
सोलापूर मध्यवर्ती कारागृहात सध्या पाचशे कैदी आहेत. नवीन इमारतीचे बांधकाम अर्धवट असल्याने जुन्याच इमारतीत कैद्यांना ठेवण्यात आले आहे. नवीन इमारत पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी २४० कैदी राहू शकतात.
- हरिभाऊ मेंड, तुरुंग अधीक्षक, सोलापूर मध्यवर्ती कारागृह
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.