11_1652.jpg
11_1652.jpg 
सोलापूर

कचरा संकलनाची 58 लाखांची बिले बनावट ! ठाण्यातील समीक्षा कन्स्ट्रक्‍शन कंपनीविरुध्द गुन्हा

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कचरा संकलनासाठी ठाण्यातील समिक्षा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला दहा वर्षांसाठी मक्‍ता देण्यात आला. मात्र, ठरलेल्या नियम व अटींचे उल्लंघन केल्याप्रकरणी महापालिकेने या कंपनीला दंड केला. शासनाच्या आदेशानुसार तो दंड कमी करुन महापालिकेने मूळ रक्‍कमेवर दंड लावला. मात्र, उर्वरित दंडाची रक्‍कम न भरता या कंपनीने तीन कोटी रुपयांच्या बिलांची मागणी करीत त्यात तब्बल 58 लाख 26 हजार 38 रुपयांची बनावट बिले दाखविली. हा प्रकार आयुक्‍तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सफाई अधीक्षक विजयकुमार कांबळे यांच्यामार्फत सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल केला.

दंडाच्या रकमेसाठीच मक्‍तेदाराने बनावटगिरी केल्याचा संशय 
ठरलेल्या नियमाप्रमाणे काम न केल्याने महापालिकेने समिक्षा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला दंड ठोठावला होता. शासनाच्या निर्देशानुसार तो दंड भरण्याची मक्‍तेदाराला नोटीस दिली होती. दंड न भरता मक्‍तेदाराने 22 जून 2020 रोजी तीन कोटींची बिले महापालिकेला सादर केली. त्यात 10 टक्‍के दंडासह दोन टक्‍के सेवाकराचा समावेश होता. त्यानंतर आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी या बिलाचे लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्यात कंपनीने तब्बल 58 लाख 26 हजार 38 रुपयांची बिले बनावट असल्याचे समोर आले. संबंधित कंपनीचे संपूर्ण बिल थांबवून ठेवले असून पोलिस चौकशीत सत्य परिस्थिती बाहेर येईल, असा विश्‍वास महापालिका आयुक्‍तांनी व्यक्‍त केला.

स्वच्छ शहर, सुंदर शहर असावे म्हणून ठाण्यातील समिक्षा कन्स्ट्रक्‍शन कंपनीला महापालिकेने 8 जून 2012 मध्ये शहरातील कचरा संकलनाचा ठेका दिला. त्यावेळी प्रतिदिन शहरातील कचरा संकलन, कचऱ्याच्या वजनाच्या पावत्या, महापालिकेच्या रजिस्टवर सेवकांच्या नियमित स्वाक्षरी असाव्यात, अशा अटी व शर्ती ठरविण्यात आल्या. मात्र, काही वर्षानंतर या कंपनीने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केले. नियोजित काम करण्यात कुचराई केल्याने तत्कालीन आयुक्‍तांनी 27 ऑगस्ट 2015 मध्ये कंपनीचा मक्‍ता रद्द केला. त्यानंतर कंपनीच्या कामाचे ऑडीट करण्यात आले. त्यावेळी 28 ऑगस्ट 2012 ते 31 डिसेंबर 2014 या काळात कंपनीने वजन पावत्या दिल्या नाहीत, अग्रीम रकमेची नोंद ठेवली नाही, महापालिकेच्या रजिस्टरवर सेवकांच्या स्वाक्षऱ्याच घेतल्या नसल्याचे समोर आले. त्यानंतर महापालिकेने या कंपनीला दंड ठोठावल्यानंतर त्यांनी शासनाकडे दंड कमी करण्यास विनंती केली. शासनाने याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यास सांगितल्यानंतर महापालिकेने ऑक्‍टोबर 2013 ते डिसेंबर 2014 या काळातील दंडाची रक्‍कम कमी केली. उर्वरित रक्‍कम भरण्यास सांगितले होते आणि तसा अहवाल शासनाला पाठविला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT