Maharashtra Polytechnic Admission Merit List 2024-25 Sakal
सोलापूर

Polytechnic Admission 2024-25 : ‘पॉलिटेक्निक’च्या पाच हजार जागांसाठी आठ हजार अर्ज

Maharashtra Polytechnic Admission Merit List 2024-25 : तात्पुरती गुणवत्ता यादी २० जुलैला, अंतिम गुणवत्ता यादी २५ जुलैला होणार प्रसिद्ध

सकाळ वृत्तसेवा

Solapur News : येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील ५७० जागांसाठी एक हजार ८३० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर जिल्ह्यातील २१ पॉलिटेक्निकमधील पाच हजार जागांसाठी आठ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. त्यांची २० जुलैला तात्पुरती तर २५ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

गुणवत्ता यादीनुसार पॉलिटेक्निक प्रवेशासाठी जागा वाटप झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी मूळ कागदपत्रांसह झेरॉक्स व प्रवेश शुल्कासह संबंधित संस्थेत त्या कालावधीत उपस्थित राहणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी https://www.poly24.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर जावून अर्ज भरताना मिळालेला लॉगिन-आयडी टाकून त्याठिकाणी मेरिट यादी व जागा वाटपाची माहिती पहावी, असे आवाहन शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी केले आहे.

आता अर्ज कन्फर्म करण्यासाठी १८ जुलैपर्यंत मुदत आहे. पॉलिटेक्निक प्रवेशासाठी आतापर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पण, आता मुदतवाढ मिळणार नाही हे निश्चित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी लागणारी सर्व कागदपत्रे आताच जवळ ठेवावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, अभियांत्रिकी प्रवेशासाठी नोंदणी देखील सुरू झाली असून २७ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार असून २ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑप्शन फार्म भरून पुढील प्रक्रिया सुरू होईल.

‘ऑप्शन’ कसे भरायचे

आता तंत्रनिकेतसाठी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यांना अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर २६ ते २९ जुलै या काळात ऑपश्न अर्ज भरायचा आहे. त्यावेळी त्यांना किमान एक ते जास्तीत जास्त सोलापूर शहर-जिल्ह्यासह राज्यभरातील ३०० तंत्रनिकेतनचे पर्याय निवडता येतील.

त्यात त्यांना आवडीचे कॉलेज, ब्रॅंच याचा पसंतीक्रम द्यावा लागतो. पहिल्या फेरीत ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित कॉलेज किंवा ब्रॅंच मिळाले नाही, त्यांच्यासाठी पुन्हा दोन राऊंड असतात. त्यावेळी आवडीची ब्रॅंच किंवा कॉलेज मिळाल्यानंतर ते ऑप्शन फ्रिज करून त्याठिकाणी प्रवेश घेवू शकतात.

अभियांत्रिकी प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन नोंदणी : १४ ते २४ जुलैपर्यंत

  • डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन : १५ ते २५ जुलै

  • तात्पुरती मेरिट यादी : २७ जुलै

  • अर्जातील दुरूस्ती : २८ ते ३० जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी : २ ऑगस्ट

  • अर्ज कन्फर्म करणे : १८ जुलै

  • तात्पुरती मेरिट यादी : २० जुलै

  • अर्ज दुरूस्ती : २१ ते २३ जुलै

  • अंतिम गुणवत्ता यादी : २५ जुलै

  • प्रथम ऑप्शन अर्ज भरणे : २६ ते २९ जुलै

  • पहिल्या फेरीतील जागा वाटप : ३१ जुलै

  • प्रथम फेरीचा प्रवेश कालावधी : १ ते ६ ऑगस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain News: पोलिसांच्या धाडसी कृतीचे कौतुक! शाळेची बस पाण्यात अडकली अन्...; विद्यार्थ्यांच्या थरारक सुटकेचा व्हिडिओ व्हायरल

Santosh Deshmukh Case: ''उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती, यांना पदावर ठेऊ नका'', धनंजय देशमुखांची अजित पवारांना विनवणी

Indian Ports Bill: समुद्री व्यापाराला बूस्ट! भारताचं ‘मेगा पोर्ट’ महाराष्ट्रात उभं राहणार, तब्बल 'इतक्या' कोटींचा प्रकल्प

Network Services Down: कॉल नाही, इंटरनेट गायब...; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!

Latest Marathi News Live Updates: १४ गावातील रेल्वेचा बोगद्यात साचले पाणी

SCROLL FOR NEXT