corona 
सोलापूर

सोलापुरात पुण्यातून आले 90 हजार अन्‌ मुंबईतून 31 हजार 

प्रमोद बोडके

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग मुंबई-पुण्यात वाढू लागल्याने शिक्षण व नोकरीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातून पुणे, मुंबईत स्थायिक झालेले एक लाख 52 हजार 955 जण आपल्या मूळ गावी (सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात/महापालिका हद्द वगळून) परत आले आहेत. पुण्यातून 90 हजार 185 तर मुंबईतून 31 हजार 119 जण सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आले आहेत. परदेशी प्रवास केलेले 138 जण सोलापूर जिल्ह्यात आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या पाहणीतून समोर आली आहे. 

अन्य जिल्ह्यांतून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींची नोंदणी गावपातळीवर घेतली जात आहे. या नोंदीतून ही माहिती समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्‍यांत पुणे, मुंबई व अन्य जिल्ह्यातून दाखल व्यक्तींची संख्या याप्रमाणे : अक्कलकोट 17 हजार 381, बार्शी 22 हजार 460, करमाळा : 21 हजार 339, माढा : 14 हजार 867, मोहोळ : सात हजार 158, माळशिरस : 16 हजार 320, मंगळवेढा : 10 हजार 941, उत्तर सोलापूर : चार हजार 171, पंढरपूर : नऊ हजार 123, सांगोला : 19 हजार 663, दक्षिण सोलापूर : आठ हजार 832. 

अन्य जिल्ह्यांतून आलेल्यांना सर्दी, खोकला 
पुणे, मुंबई, अन्य देशातून व जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात आलेल्या दोन हजार 52 व्यक्तींना आज (रविवार) सर्दी, खोकला व ताप असल्याची माहिती देखील या अहवालातून समोर आली आहे. त्यात बार्शी तालुक्‍यातील 239, माळशिरस 343, पंढरपूर 520, दक्षिण सोलापूर 128, सांगोला 214, मंगळवेढा 133, मोहोळ 89, माढा 214, करमाळा 49, उत्तर सोलापूर येथील 55 व्यक्तींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोल्हापूर हादरलं! 'मोक्या'तील गुन्हेगारावर अज्ञातांचा गोळीबार; रिंग रोडवर तणाव, नेमकं काय घडलं?

Double Decker Bus: पुण्यात दिसणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस! मंगळवारपासून शहरातील 'या' रस्त्यांवर धावणार

Latest Marathi News Live Update : वेस्टर्न एक्सप्रेस-वेवर अपघात, पाच कार अन् एक बसची एकमेकांना धडक, प्रवाशी किरकोळ जखमी

अमेरिकेत महागाईचा भडका! भारतीयांवर मोठी जबाबदारी; रघुराम राजन यांच्यासह या ३ व्यक्ती फेडच्या टास्क फोर्समध्ये

IND vs ENG: दुसऱ्या वनडेपूर्वी भारताला मोठा धक्का! गुरनूर ब्रारवर ICC ची कारवाई; वाचा नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT