Corona 
सोलापूर

अरेव्वा ! कुर्डूतील 96 वर्षीय आजीने केली कोरोनावर मात

वसंत कांबळे

कुर्डू (सोलापूर) : माढा तालुक्‍यातील कुर्डू येथील 96 वर्षीय आजी कोरोना या महामारी रोगावर यशस्वीपणे मात करून उपचार घेऊन सहीसलामत घरी परतली आहे. यामुळे कोरोनाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांच्या चर्चा आता थांबण्यास मदत होणार आहे. या आजी खऱ्या अर्थाने कोरोनायोद्धा ठरल्या आहेत. कुर्डूत आजपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह 44 रुग्ण सापडले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला असून 34 जण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर आठजण उपचार घेत आहेत. 

कुर्डू या नागनाथाच्या नगरीमध्ये कोरोनाचा शिरकाव हा पुण्याहून आलेल्या कोरोना रुग्णामुळे झाला होता. त्यामुळे पहिल्यांदा 23 जण पॉझिटिव्ह आले. नंतर इतरांच्या संपर्कात आल्यामुळे 96 वर्षीय आजीलाही 13 ऑगस्ट रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारासाठी त्यांना भोसरे हद्दीत असणाऱ्या श्रीराम मंगल कार्यालयात असणाऱ्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. दहा दिवसांच्या यशस्वी उपचारानंतर आज गणेश चतुर्थी दिवशी (शनिवारी) सकाळी या आजीसह 13 जणांना घरी सोडण्यात आले. त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातील दहा जणांचाही यात समावेश होता. या जीवघेण्या आजारावर मात केल्याने सर्वत्र या आजीचे कौतुक होत आहे. 

या आजारात आजपर्यंत मृत्यू पावलेल्यांमध्ये वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश आहे. पण वयोवृद्ध व्यक्तीही या आजारातून बरे होतात, हे या आजीने दाखवून दिले आहे. या वेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. गिलोनी खान, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी डॉ. पाटलोजी चव्हाण, आरोग्य सहाय्यक शंकर पवार, आरोग्य सेविका बंडगर, नलवडे आदी उपस्थित होते. गावत येताच आजीचे सरपंच जिजाऊ भोसले, उपसरपंच शिवाजी कापरे, माजी तालुका पंचायत समिती सदस्य नामदेव हांडे, माजी उपसरपंच संदीप पाटील, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व ग्रामस्थांनी स्वागत केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेगावजवळ ओव्हरहेड केबल तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; अमरावती–पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्या खोळंबल्या

२०४७ पर्यंत एसटी बसेस १०० टक्के ईव्ही करणार, चार्जिग स्टेशन उभारण्याच्या कामाला गती देण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT