नियम डावलून पळविल्या म्हशी ! दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा
नियम डावलून पळविल्या म्हशी ! दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा Canva
सोलापूर

नियम डावलून पळविल्या म्हशी ! दहाजणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा

तात्या लांडगे

आषाढ मासानिमित्त कर्णिक नगरात म्हशी पळविण्याचा कार्यक्रम पार पडला.

सोलापूर : आषाढ मासानिमित्त कर्णिक नगरात म्हशी पळविण्याचा कार्यक्रम पार पडला. परंतु, कोरोनाच्या (Covod-19) पार्श्‍वभूमीवर शनिवार, रविवारी संपूर्ण दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असून जमावबंदीही लागू आहे. तरीही, कोरोना नियम पायदळी तुडवत हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत पोलिस उपायुक्‍त डॉ. वैशाली कडूकर (Deputy Commissioner of Police Dr. Vaishali Kadukar) यांच्या आदेशानुसार आयोजकांवर जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. (A case has been registered against ten people for breaking the rules and running a buffalo race-ssd73)

कोरोनामुळे शहरातील निर्बंध शिथिल होत नसून नागरिकांनी कोटेकोरपणे नियमांचे पानल केल्यास आगामी काळात निश्‍चितपणे निर्बंध उठतील, असा विश्‍वास पोलिसांनी तीन दिवसांपूर्वीच आयोजकांसमोर व्यक्‍त केला होता. मागील वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सव साध्या पद्धतीने साजरा करा, असेही बजावले होते. त्या वेळी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तरीही, रविवारी बऱ्याचजणांनी अचानक नियबाह्य पद्धतीने म्हशी पळविण्याचा कार्यक्रम घेतला. आयोजकांसह त्या ठिकाणी उपस्थितांविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. दहाजणांविरुद्ध रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या म्हशीही पोलिसांनी ताब्यात घ्याव्यात, असे आदेश पोलिस उपायुक्‍त डॉ. कडूकर यांनी दिले आहेत. जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तत्पूर्वी, कर्णिक नगराचा काही भाग एमआयडीसी तर काही परिसर जेलरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत येतो. त्यामुळे सुरवातीला नेमका गुन्हा कोणी दाखल करायचा, या वादात गुन्हा दाखल करण्यास विलंब झाल्याची चर्चा आहे.

आषाढ मासानिमित्त म्हशी पळविण्याचा कार्यक्रम घेता येणार नाही, असे बजावून देखील काहींनी जाणीवपूर्वक कोरोना नियमांचे उल्लंघन केले आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

- डॉ. वैशाली कडूकर, पोलिस उपायुक्‍त

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

लक्ष्मण माणिक गड्यप्पा (रा. मस्तान हॉटेलमागे, अशोक चौक), राजू रामचंद्र भास्कर (रा. शनि मंदिरशेजारी, कुमठा नाका), सुरेश माणिक कलागते, विकास बाबूराव कलागते (रा. गवळी वाडा, मुस्लिम पाच्छा पेठ), गणेश बंडू खंडेराव (रा. गांधी नगर, जुना अक्‍कलकोट नाका), वैभव दत्तात्रय बहिरवाडे (रा. भगवान नगर झोपडपट्टी), शुभम अशोक कलागते (रा. तेलंगी पाच्छा पेठ), दिलीप राजेंद्र भास्कर, अभिजित राजेंद्र भास्कर (दोघेही रा. कुमठा नाका), यशवंत अंबादास बडवणे (रा. अशोक चौक) यांच्याविरुद्ध जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT