HIV  google
सोलापूर

‘एचआयव्ही’बाधितांच्या दाखल्यासाठी एक खिडकी योजना

जिल्हाधिकारी शंभरकर : तहसीलदार दर्जाचा नेमणार नोडल अधिकारी

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जिल्ह्यातील एचआयव्हीबाधितांचे पुनर्वसन व्हावे. कोणत्याही दाखल्यासाठी त्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, यासाठी एक खिडकी योजना उपक्रम राबविण्यात येत आहे. हा राज्यातील पहिलाच उपक्रम असेल. एचआयव्हीबाधितांच्या अडचणी सोडवण्यासाठी तहसीलदार दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात रूग्णालय आणि जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, वाय.आर. गायतोंडे सेंटर फॉर एड्‌स रिसर्च ॲन्ड एज्युकेशन, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यावतीने आयोजित एक खिडकी योजनेचे उद्‌घाटन आणि एचआयव्हीबाधित बालकांना पोषण आहार वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, वायआरजीचे व्यवस्थापक वासुदेवन, औषध विभागप्रमुख डॉ. विठ्ठल धडके, डॉ. श्रीमती जयस्वाल, डॉ. अग्रजा वरेरकर आदींसह रूग्ण उपस्थित होते.

श्री. शंभरकर म्हणाले, एचआयव्हीबाधितांना आता दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागणार नाहीत. एक खिडकी योजनेतून त्यांना सर्व प्रकारचे दाखले मिळण्यास मदत होणार आहे. केवळ त्यांनी आपली कागदपत्रे जमा करावीत. सामाजिक संस्था आणि जिल्हा एड्‌स प्रतिबंध व नियंत्रण विभागाद्वारे दाखल्याची प्रक्रिया पार पाडली जाईल. जिल्ह्यातील सर्व गरोदर मातांनी एचआयव्हीची चाचणी करून घ्यावी. पॉजिटिव्ह असाल तर घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत. नियमित औषधोपचार आणि योग्य आहार घेतल्यास रूग्णांना काहीच त्रास होत नाही. अधिकाऱ्यांनी एचआयव्हीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावेत. एक खिडकी योजनेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा. डॉ. ढेले म्हणाले, एक खिडकी योजनेतून एकाच ठिकाणी सर्व सुविधा, कागदपत्रे काढण्यासाठी मदत होणार आहे. मुलांच्या पोषण आहाराची सोय याठिकाणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT